Download App

‘धनंजय मुंडे,आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा’, NCP नेत्याच्या विधानाचा दाखला देत दमानियांचे ट्विट

धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडने केली, सुदर्शन घुले अन् विष्णू चाटेने केली,

  • Written By: Last Updated:

Anjali Damania : मंत्री धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) शिर्डीतील अधिवेशनात बीड प्रकरणावरून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केले. माझ्यावर किंवा इतर कोणावर आरोप करायचे असतील तर खुशाल करावे, परंतु माझ्या बीड जिल्ह्याची आणि येथील मातीची बदनामी करू नका, अशी विनंती त्यांनी केली. मुंडेंच्या या वक्तव्यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी टोला लगावला.

धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडने केली, सुदर्शन घुले अन् विष्णू चाटेने केली, असं दमानिया यांनी म्हटलं. तसेच आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा, असंही म्हटलं.

VIDEO : MahaKumbh 2025: कुंभमेळाव्यात भीषण अग्नितांडव 

अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. दमानिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली. तुमच्या वाल्मिक कराडने केली. सुदर्शन घुलेनी केली, विष्णू चाटेनी केली. संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने केली. जाऊ द्या, मला त्यावर फार बोलवत नाही. बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, असं त्या म्हणाल्या.

दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या विधानाचा दाखला दिला. त्यांनी लिहिलं की, तुमच्याच पक्षातील लोक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बीडबद्दल काय म्हणाले होते ते वाचा – राज्यातील एका जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण राज्यात पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होत आहे, असे तुमच्याच पक्षातील लोक म्हणाले आहेत. पक्षाच्या हिताचा विचार करून पक्ष नेतृत्वाने बीड हत्याकांड प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आगामी निवडणुकांसाठी अशी बदनामी होणे पक्षाच्या हिताचे नाही…. ही वक्तव्ये पाहून आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा, असं दमानिया यांनी म्हटलं.

धनंजय मुंडेंच्या लाभार्थी टोळ्या संपल्या पाहिजेत, आक्रोश मोर्चात जरांगेंचा हल्लाबोल 

धनंजय मुंडे काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे अधिवेशन शिर्डी येथे सुरू आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनीही आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्यात सहभाग घेतला. अधिवेशनात बोलताना त्यांनी बीड प्रकरणावर भाष्य केले. जर तुम्हाला माझी बदनामी करायची असेल तर करा. आणखी कोणाला बदनाम करायचे असेल तर ते देखील करा. पण माझ्या बीड जिल्ह्याला आणि येथील मातीला बदनान करू नका. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ या पवित्र नगरीची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये, अशी माझी सर्वांना विनंती आहे, असं मुंडे म्हणाले होते.

follow us