VIDEO : MahaKumbh 2025: कुंभमेळाव्यात अग्नितांडव, तासभरात आग आटोक्यात

MahaKumbh mela हा Prayagraj येथे होत आहे. रविवारी दुपारी या भागातील काही तंबुंना आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्यात येत आहे.

  • Written By: Published:
Maha Kumb 2025 fire broke out

Fire breaks out at MahaKumbh mela area in Prayagraj : प्रयागराज येथे महाकुंभ (MahaKumbh 2025) सुरू आहे. या ठिकाणी कोट्यवधी भाविक हे पवित्र स्नान करण्यासाठी येत असतात. परंतु रविवारी येथे काही भागाला भीषण आग लागली आहे. येते राहत असलेल्या व्यक्तींसाठी तंबू लावण्यात आले आहेत. या तंबूला आग लागली आहे. आग पसरत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

Mahakumbh 2025: डोक्यावर 1.25 लाख रुद्राक्ष, वजन 45 किलो; महाकुंभात पोहोचलेले गीतानंद गिरी कोण?

तंबू लावलेले आहेत. या तंबूत महाकुंभाला आलेले बाबा लोक राहत आहेत. या ठिकाणी जेवण करत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आखाड्यासमोरील रस्त्यावरील शास्त्री ब्रिज सेक्टर-19 कॅम्पला भीषण आग लागली आहे. यातील तंबुंना आग लागलेली आहे. 30 ते 35 तंबूंना आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग विझविण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत. या आगीत किती नुकसान झाले आहे, याची अधिकृत माहिती अद्याप प्रशासनाकडून मिळालेले नाही. तर तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.


VIDEO : महाकुंभमेळ्यात ‘साध्वी’ने लक्ष वेधलं; सुंदरतेचं कौतुक अन् कमेंटचा वर्षाव…

follow us