VIDEO : महाकुंभमेळ्यात ‘साध्वी’ने लक्ष वेधलं; सुंदरतेचं कौतुक अन् कमेंटचा वर्षाव…
MahakumbhMela : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळ्याला आजपासून प्रारंभ झालायं. या महाकुंभमेळ्यात (MahakumbhMela ) देशभरातील आखाड्यातील अघोरी नागासाधू, साध्वी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. महाकुंभमेळ्याला सुरुवात होण्याआधीच देशभरातून नागासाधूंनी प्रयागराजमध्ये मोठी गर्दी केली होती. अखेर आजपासून या महाकुंभमेळ्याला सुरुवात झालीयं. या महाकुंभमेळ्यामध्ये एका साध्वीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. रथामध्ये बसून ही साध्वीमाता कुंभमेळ्यात दाखल झाली असून याआधी ही साध्वीमाता (Sadhvi) एक अभिनेत्री होती. मागील दोन वर्षांपासून ती आचार्य महामण्डलेश्वर स्वामी कैलाशानंदगिरी जी महाराजांची शिष्य असल्याचं सांगितलं जात आहे. या साध्वीने माध्यमांशी संवाद साधला असून हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होतोयं.
About For Viral Video
महाकुंभ में आई बहुत ही खूबसूरत साध्वी
पत्रकार ने पूछा आप इतनी सुन्दर हैं तो साध्वी क्यों बनीं? pic.twitter.com/48ANV8euTR— ममता राजगढ़ (@rajgarh_mamta1) January 13, 2025
साध्वीची सुंदरता पाहून त्यांना सवाल करण्यात आलायं. तुम्ही इतके सुंदर आहात, मग साध्वी का बनलात? असा थेट सवाल करण्यात येत आहे. त्यावर साध्वीने आपलं दिलेलं उत्तर ऐकून नेटकऱ्यांचं लक्ष वेधण्यात आलंय. ‘मी उत्तराखंडमधून आले आहे आणि मी आचार्य महामंडलेश्वरांची शिष्या आहे. मला आजवर जे करायचं होतं ते मी केलंय. त्यानंतर सर्वकाही सोडून मी साध्वी बनली आहे. साध्वी बनून मला माझ्या आयुष्यात एक वेगळीच शांती अनुभवता येतेय. मी 30 वर्षांची असून गेल्या दोन वर्षांपासून साध्वीच्या रुपात आयुष्य जगतेय”, असं साध्वीने सांगितलंय.
तसेच तुम्ही आयुष्यात बरंच काही करता. तुम्ही अभिनय केलंय, अँकरिंग केलंय, देश-विदेशात फिरलात.. सर्वकाही केलंत. त्यानंतरसुद्धा तुम्हाला आयुष्यात शांतीचा अनुभव येत नाही. पैसा आहे, प्रसिद्धी आहे.. पण मन शांत नाही. मग जेव्हा भक्ती तुम्हाला आपल्याकडे आकर्षित करते, तेव्हा तुम्ही लोकांपासून दूर जाऊन देवाच्या शरणी मग्न होता. भजन-कीर्तन, मंत्र, जप यात तुमचं मन रमू लागतं, असंही त्या म्हणाल्या आहेत.
कोण आहेत साध्वीमाता?
हर्षा रिछारिया असं या साध्वीचे नाव असून त्या निरंजनी आखाड्याच्या शिष्य आहेत. त्या स्वत:ला सामाजिक कार्यकर्त्या म्हणवतात. हर्षा रिछारिया या आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंदगिरी महाराजांची शिष्य आहेत. सध्या त्या उत्तराखंडमध्ये राहत असून त्या मध्य प्रदेशातील भोपालमधील आहेत. स्वत:ला त्या हिंदु सनातनी शेरनी असल्याचं सांगत आहेत.
सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग
हर्षा रिछारीया यांच्या इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग असून त्यांचे 667K इतके फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवरील प्रोफाईलवर त्यांनी आपले रिल्स व्हिडिओ फोटो पोस्ट केलेले आहेत. आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंदगिरी महाराजांसोबतचा फोटोदेखील त्यांनी शेअर केलायं.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून महाकुंभमधील आखाड्यासोबतच त्यांचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत असंख्य लोकांना पाहिलायं. हा व्हिडिओ पाहुन नेटकऱ्यांकडून सर्वांत सुंदर साध्वीची पदवी देण्यात येत आहे.