Ayodhya : राम मंदिर आंदोलनात मोठं योगदान देणाऱ्या उमा भारती-साध्वी ऋतंभरा ढसाढसा रडल्या
Uma Bharti and Sadhvi Ritambhara get emotional while ram mandir pranpratishtha : आज अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरात (Shri Ram Temple) वैदिक मंत्रोच्चाराने रामल्लाची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. भारताच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. या अभिषेक सोहळ्यात देशभरातून आणि जगभरातून 7 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. दरम्यान, राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उमा भारती (Uma Bharti) आणि साध्वी ऋतंभरा (Sadhvi Ritambhara) यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. या दोघीही याक्षणी भावूक झाल्या होत्या. त्यांनी एकमेकांनी मिठी मारून आपला आनंद व्यक्त केला.
Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कार्यक्रमांची रेलचेल, बाणेरमध्ये विश्व विक्रम!
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये एकमेकींनी पाहताच उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी पाहिलेलं स्वप्न साकार होत असल्यानं त्यांना प्रचंड आनंद झाला होता. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दोघींनीही एकमेकींना शुभेच्छा दिल्या.
उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा कोण?
उमा भारती या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री होत्या. उमा भारती या साध्वी असून त्यांनी साध्वी म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उमा भारती यांनी 1984 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. 1989 च्या निवडणुकीत त्या जिंकल्या. 1991 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर मध्य प्रदेशातील खुजराहो लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर त्यांनी ही जागा सलग तीन वेळा जिंकली. त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भूषवली. 2003 मध्ये उमा भारती यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. त्या राम मंदिर आंदोलनातील प्रमुख नेत्या होत्या.
‘२ दिवसांत हल्लेखोरांना अटक करा, नाही तर…’; रामभक्तांवर झालेल्या हल्यानंतर प्रताप सरनाईक आक्रमक
साध्वी ऋतंभरा या राममंदिर आंदोलनातील एक अनोख्या हिंदू नेत्या होत्या. अयोध्या रामजन्मभूमी मोहिमेतील महिला चेहरा म्हणून उमा भारती यांच्यानंतर साध्वी ऋतंभरा यांचे नाव घेतले जाते. रथयात्रेत त्यांच्या भाषणांच्या ऑडिओ कॅसेटची चांगली विक्री झाली.
राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली
६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली, त्यानंतर या दोघांनीही बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, अशोक सिंघल, गिरीराज यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांसह आरोपी करण्यात आले. किशोर आणि विष्णू हरी दालमिया यांच्यासोबत संघ परिवारातील अनेक नेत्यांवर आरोप झाले. तथापि, 30 सप्टेंबर 2020 रोजी विशेष न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
भगवान रामाने धैर्य दिले: साध्वी ऋतंभरा
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, राम मंदिर आंदोलनादरम्यान प्रभू रामाने आपल्याला मंदिरासाठी लढत राहण्याची हिंमत आणि क्षमता दिली होती. त्या पुढे म्हणाले की, या सोहळ्यात सहभागी झालेले सर्व लोक भाग्यवान आहेत. मलाही या सोहळ्यात सहभागी झाल्यानं खूप आंनद झाला. हा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाले की, प्रभू राम मंदिराचे निर्माण हे हिंदू समाजाने दाखवलेल्या धाडसाचे परिणाम आहे. अनेक लोकांच्या हौतात्म्याचा हा परिणाम आहे. साध्वी ऋतंभरा पुढे म्हणाल्या की, आम्ही 500 वर्षांहून अधिक काळ भगवंताची स्थापना करण्यासाठी संघर्ष केला आणि आज त्या संघर्षाचं फलित झालंय, असं त्या म्हणाल्या.