महाकुंभामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळणार? 45 दिवसांत 4 लाख कोटींपेक्षा जास्त उलाढालीचा अंदाज

महाकुंभामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळणार? 45 दिवसांत 4 लाख कोटींपेक्षा जास्त उलाढालीचा अंदाज

More Than 4 Lakh Crore Business In Mahakumbh 2025 : उद्यापासून प्रयागराजच्या त्रिवेणी संगमवर महाकुंभास (Mahakumbh 2025) सुरूवात होणार आहे. या महाकुंभामेळा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते, असं म्हटलं जातंय. या महाकुंभात 4 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त उलाढाल होवू शकते. असं झाल्यास देशाचा जीडीपी एक टक्क्यापेक्षा जास्त वाढू (Business In Mahakumbh) शकतो. उत्तर प्रदेश सरकारने या महाकुंभास देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रिय असे दोन्ही मिळून 40 कोटी पर्यटक भेट देतील असा अंदाज व्यक्त केलाय.

तीन-चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकले !

उत्तर प्रदेश सरकारने वर्तवविलेल्या अंदाजानुसार जर 40 कोटी पर्यटक या मेगा इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहेत. यापैंकी प्रत्येक पर्यटकाने 5 हजार रूपये खर्च केले तर महाकुंभात 2 लाख कोटी रूपयांचा व्यवसाय निर्माण (Mahakumbh Update) होईल. या मेगा इव्हेंटमध्ये सरासरी दरडोई खर्च 10 हजार रुपयांपर्यंत असू शकतो. त्यामुळे या कालावधीत एकूण व्यवसाय 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो, असा अंदाज आहे.

ब्रँडिंग-मार्केटिंगवर 3 हजार कोटींहून अधिक खर्च

महाकुंभ एकूण 45 दिवस चालणार नाही. या कार्यक्रमात आपली उपस्थिती दाखवण्यासाठी भारतीय तसेच परदेशी कंपन्या महाकुंभात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा करत आहेत. उद्योग तज्ञांच्या मते, जलद गतीने चालणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG) पासून ते औषध क्षेत्रापर्यंत आणि गतिशीलता पुरवठादारांपासून ते डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मपर्यंत, कंपन्या महाकुंभात ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज स्टील कंपनी ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) ने महाकुंभमेळा 2025 मध्ये विविध संरचनांच्या बांधकामासाठी सुमारे 45 हजार टन स्टीलचा पुरवठा केला आहे.

भारताचा पराभव केला पण मिळाली आयसीसीची नोटीस; आयर्लंडच्या गोलंदाजामुळे नवा वाद

महारत्न कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, कंपनीने पुरवलेल्या स्टीलमध्ये चेकर्ड प्लेट्स, हॉट स्ट्रिप मिल प्लेट्स, माइल्ड स्टील प्लेट्स, अँगल आणि जॉइस्ट यांचा समावेश आहे. सनातन धर्माच्या संताच्या सर्वात मोठ्या मेळाव्यापूर्वी प्रयागराजमध्ये मोठे बदल करण्यात आलेत. भव्य आध्यात्मिक मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या लाखो भाविकांना अखंड कनेक्टिव्हिटी मिळावी, यासाठी 200 हून अधिक रस्ते बांधण्यात आलेत. त्यांचे अपग्रेडेशन करण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवर 3 लाखांहून अधिक रोपे लावून त्यांचं सौंदर्यीकरण करण्यात आलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube