देवेंद्रजींनी आधुनिक अभिमन्यू असल्याचं सिद्ध केलं; चंद्रशेखर बावनकुळे

देवेंद्रजींनी आधुनिक अभिमन्यू असल्याचं सिद्ध केलं; चंद्रशेखर बावनकुळे

 Chandrashekhar Bawankule In BJP Adhiveshan Shirdi : शिर्डीत भाजपचं (BJP) महाअधिवेशन सुरू आहे. यासाठी भव्य तयारी करण्यात आली. त्यानिमित्ताने स्थानिक पातळीवरील भाजपचे कार्यकर्ते, राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे आभार मानतो, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य केलं. भाजप नेते अन् महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी येथे भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ही श्रद्धा आणि सबुरीची भूमी आहे. या पवित्र भूमित भाजपचं अधिवेशन (BJP Adhiveshan) होतंय. श्रद्धा, सबुरी आणि भाजपची महाभरारी या संकल्पनेवर अधिवेशन होतंय. जनतेने मोठा जनादेश दिलाय, त्या मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी हे अधिवेशन होतंय, असं बावनकुळे म्हणालेत. आजचा दिवस अतिशय मंगल आहे. आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे.

Rakul Preet Singh : रकुल प्रीत सिंहचा कुल लूक; मादक अदा पाहून चाहते घायाळ

कार्यकर्त्यांनी दोन-अडीच वर्ष चांगलं समर्पण केलंय. तालुक्यापासून प्रदेशापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलंय. लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतसारखी लढलो. पण विरोधकांच्या खोटारड्यापणामुळे यश मिळालं नाही. आपण फसलो, पण निराश झालो नाही. देवेंद्रजी अन् वरिष्ठ नेत्यांनी या नैराश्यातून बाहेर निघण्यासाठी आमच्यासमोर मार्ग ठेवला. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही शिकलो पुढे गेलो. आम्ही काही योजना तयार केल्या. नैराश्यातून बाहेर निघालो नसतो, तर विजय झाला नसता. अच्छे दिन आयेंगे हा विचार मनात होता. पुण्यातील अधिवेशनातून देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा जिंकण्याचा शंखनाद केला.

CM देवेंद्र फडणवीसांना भेटताना लाज वाटत नाही का? शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरेंना सवाल

भाजपची ही अभुतपूर्व महाभरारी आहे. भारतीय जनता पार्टीचे 108 जागेवर लोकप्रतिनिधी निवडून आलेत. हा महाविजय कार्यकर्त्यांच्या एकीचं बळ आहे. आपण सर्वांनी निश्चित केलेल्या ध्येयामुळे यश काबिज झालंय. आपल्यासोबत झालेली बेईमानी, पाठीत खंजीर खुपसला गेला. मला आठवतं झालेला विश्वासघात, देवेंद्रजींना चक्रव्यूहात अडकवण्यासाठी केलेले प्रयत्न, देवेंद्रजींना अतिशय हीन शब्दांत हिणवलं गेलं. देवेंद्रजींनी आधुनिक अभिमन्यू आहेत, हे सिद्ध करून दाखवलं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

आझाद मैदानावर पाच डिसेंबर रोजी 2024 ला पाच हजार कार्यकर्त्यांसमोर देवेंद्र फडणवीस पुन्हा शपथविधीसाठी आले. श्रद्धा आणि सबुरीच्या या मंचावर महायुतीचं सरकार स्थापन झालं. देवेंद्रजींनी तीन भाषणात म्हटलं होतं, श्रद्धा ठेवा. सबुरी ठेवा पुन्हा आपला तो दिवस येईल, अन् तो दिवस आला. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 52 टक्के मतं मिळाली, असं बावनकुळे म्हणालेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube