CM देवेंद्र फडणवीसांना भेटताना लाज वाटत नाही का? शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरेंना सवाल
Shinde Shiv Sena Ramdas Kadam Reaction On Aaditya Thackeray : विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीसांची (CM Devendra Fadanvis) तीनवेळा भेट घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया समोर आलीय. तुम्ही स्वाभिमान गहाण ठेवलाय का? देवेंद्र फडणवीस यांना भेटताना लाज वाटत नाही का? या शब्दांत रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.
‘छोले’ बनवणं जीवावर बेतलं; गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले, सकाळी झाला मृत्यू
रामदास कदम म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक गोष्ट सांगेन की आम्ही या लोकांसोबत 55 वर्ष होतो. तुळजाभवानीची शपथ घालून रामदास कदम फडणवीसांना म्हणाले की, या सापांना जवळ करू (Maharashtra Politics) नका. कितीही जवळ घेतलं तरी ही लोकं विष ओकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना सोबत घेवून नका, अशी तीव्र प्रतिक्रिया कदम यांनी व्यक्त केलीय. दापोलीमधील एका कार्यक्रमात रामदास कदम बोलत होते.
रामदास कदम म्हणाले की, दिशा सालियान नावाच्या मुलीनं आत्महत्या केली होती. ते प्रकरण देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर यांना (आदित्य ठाकरे) कठीण होईल . त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठी सुरू झाल्यात. स्वत:ला वाचवण्यासाठी देवा भाऊच्या नावाचा जप करत आहेत. उद्धव ठाकरे आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला, असा सवाल त्यांनी केलाय.
हात जोडतो, पाया पडतो.. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका; खैरे थेट व्यासपीठावर नतमस्तक
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा भेट घेतलीय. पुढील काही महिन्यांत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याचे बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीचं महत्त्व वाढल्याचं बोललं जातंय. याआधी आदित्य ठाकरे यांनी नागपुरातील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटींबाबत शिवसेना शिंदे गटाची तीव्र प्रतिक्रिया समोर आलीय. तसेच भाजपला देखील आवाहन केलं जातंय.