Aaditya Thackeray : …तर मी आताचं राजीनामा देतो; आदित्य ठाकरेंचं CM शिंदेंना खुलं आव्हान

Aaditya Thackeray : …तर मी आताचं राजीनामा देतो; आदित्य ठाकरेंचं CM शिंदेंना खुलं आव्हान

Aaditya Thackeray on Eknath Shinde : शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर राज्यात शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका टीपण्णी सुरू असते. यामध्ये कधी टीका केली जाते तर कधी एकमेकांना आव्हनं दिली जातात. यावेळी देखील असंच एक आव्हान ठाकरे गटातील आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एककनाथ शिंदे यांना दिले आहे.

Congress Politics : राजकारणातील गुगली ‘या’ नेत्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हुकली

पत्रकारांशी बोलताना जेव्हा आदित्य यांना प्रश्न विचारण्यात आला की, आदित्य ठाकरे यांनी वरळीतुन राजीनामा द्यावा आणि पुन्हा लढवुन यावं असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. त्यावर आदित्या ठाकरे यांनी प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत म्हटले की, जर सुधीर मुनगंटीवार घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करत असतील तर मी आत्ता माझा राजीनामा द्यायला तयार आहे. या अगोदर देखील आदित्य यांनी शिंदेंना हे आव्हान दिले होते.

दंगली हव्या आहेत का?; भाजपला सवाल करत राज ठाकरेंनी त्र्यंबकेश्वर वादावर सुचवला उपाय

तसेच पुढे आदित्य ठाकरेंनी मुनगंटीवार आणि शिंदे यांच्यावर टीकाही केली. सुधीर मुनगंटीवार यांचं या सरकारमध्ये कोणी ही ऐकत नाही. तर मुख्यमंत्र्यांना कारभार जमत नाही आहे. गोंधळ सुरु आहे. स्वत:चं पद कसं वाचवुन ठेवायचं हे एवढेच मुख्यमंत्र्यांना माहित आहे. या गद्दार सरकारच्या विरोधात सगळेच राजकीय पक्ष एकत्रित आले आहोत. जर कर्नाटकात 40 टक्के भ्रष्टाचारी सरकार असेल तर महाराष्ट्रात 100 टक्के भ्रष्टाचारी सरकार आहे. अशी टीका आदित्या ठाकरेंनी केली.

Weather Update : पुढील तीन दिवस राज्यात तापमान वाढणार, हवामान विभागाने दिला इशारा

या दरम्यान आता थेट ठाकरे गटाची ढाल मानल्या जाणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. राऊत म्हणाले की, शिंदे आमचे मित्र होते. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. तसेच मलाही शिंदे गटात जायची ऑफर होती. मात्र मी शिंदे गटात जात नाही, शिवसेना ठाकरे गट सोडत नाही म्हणून मला तुरूंगात टाकलं. पण मी शिंदे गटात न जाता तुरूंगात गेलो. मला ही ऑफर दिली होती त्याबद्दल सर्वांना माहीत आहे. पण मी म्हटलं मान कापली तरी मी शिंदे गटात जाणार नाही. असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.

Aaditya Thackeray on Eknath Shinde

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube