दंगली हव्या आहेत का?; भाजपला सवाल करत राज ठाकरेंनी त्र्यंबकेश्वर वादावर सुचवला उपाय
Raj Thackeray On Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) 13 मे रोजी धूप दाखवण्याच्या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. काही हिंदू संघटनांना अन्य धर्मीय लोकांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता. त्यानंतर उरूस आयोजकांनी पुढील वर्षीपासून त्र्यंबकेश्वरला धूप-अगरबत्ती न दाखवण्याचा निर्णय घेतला. या मंदिराच्या मुद्द्यावर जे काही घडलं, त्यावरून चांगलचं वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोप होते. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केले आहे. त्र्यंबकेश्वरच्या मुद्दात बाहेरच्यांनी पडू नये. मंदिराबाबतचा निर्णय तिथल्या ग्रामस्थांनीच सोडवावा, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायरीवर धूप फिरवण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे, त्यामुळे ती बंद करण्यात अर्थ नाही. हिंदू धर्म इतका कमकुवत आहे का की अन्य धर्मातील व्यक्ती आपल्या मंदिरात आल्यास हिंदू धर्म भ्रष्ट होईल? असा सवाल राज ठाकरेंनी केला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की, अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथं हिंदू-मुस्लिम एकत्रित राहतात. तिथे दंगली होत नाहीत. कारण, ते अनेक पिढ्या इथं राहिलेली असतात. त्यांच्या नोकरी धंदे इकडे असतात. उगाच सामजस्य बिघून नये. त्यामुळं आता त्र्यंबकेश्वराच्या मुद्दयात बाहेरच्यांनी पडू नये, याबाबत तिथल्या ग्रामस्थांनी निर्णय घ्यावा, असं ते म्हणाले.
मिस्ड कॉल द्या, अर्ज भरा अन् मदत मिळवा; मुख्यमंत्री सहायता निधीत मोठा बदल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या घटनेवर भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर मुद्द्यावरून राजकारण्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्र्यंबकेश्वर मंदिरात जे काही झाले ते चुकीचे आहे. यातून कोणाला दंगल घडवायची आहे का? जिथे चुकीच्या गोष्टी घडत असतील तिथे प्रहार करणं गरजेचं आहे, मी भोंग्याचा विषय काढला. दर्ग्यावर बोललो होतो. गड किल्यावर जे दर्गे आहेत, ते हटवले पाहिजेत. ठाण्यामधीलही नुकतीच एक अनधिकृत मज्जीद मी हटवली, पण, मुद्दाम काहीतरी खोदून काढायचं याला अर्थ नाही, असं ते म्हाले.
राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक भागात दंगली उसळल्या आहेत. या दंगलीनंतर भाजपच्याच लोकांनी हिंदू खतरें मे है, असं म्हणत आंदोलनं केली. याविषयी बोलतांना राज ठाकरे यांनी बहुसंख्य हिंदू असलेल्या राज्यात ‘हिंदू खतरे मे’ कसा काय असू शकतो, असा सवाल केला.