धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार? विचारताच अजित पवार भडकले; म्हणाले, तुझं नाव…
Ajit Pawar Reaction On Santosh Deshmukh Murder : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) भडकल्याचं समोर आलंय. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात काही लोकांना अटक झालीय. याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित काही लोकांवर आरोप करण्यात आलाय. खंडणी प्रकरणी देखील काही लोकांना अटक करण्यात आलीय. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया (Santosh Deshmukh Murder) समोर आलीय.
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील काही नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र (Maharashtra Politics) आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी अजित पवार पत्रकारांवरच भडकल्याचं समोर आलंय. कोणत्याही प्रकरणात तुझं नाव आल्याशिवाय तुझी चौकशी कशी होईल? असा सवाल अजित पवार यांनी केलाय. त्यांनी अधिक याप्रकरणी अधिक बोलण्यास नकार देखील दिला.
CM देवेंद्र फडणवीसांना भेटताना लाज वाटत नाही का? शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरेंना सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड प्रकरणात चौकशी सुरू होईल. जे कोणी दोषी असतील त्यावर कारवाई करण्यात येईल. सगळ्या चौकशी सुरु आहेत. मला महाविकास आघाडीचं माहिती नाही, मी महायुतीत काम करतोय. बीड प्रकरणाचे कोणी दोष असतील, त्यांच्यावर कारवाई झाली होईल. चौकशीत नाव आलं तर सर्वांची चौकशी होईल. असं धनंजय मुंडे यांच्या राजिनामाबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नावर अजित दादांनी उत्तर दिलंय.
महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नव्हतो…स्वतंत्र निवडणुका लढण्यावर राऊत काय म्हणाले?
तसेच वाहतुक नियमांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांनी वाहतूक शिस्त पाळली पाहिजे. पाच हजार रुपये दंड करण्याचा विचार असून प्राथमिक चर्चा सुरू आहेत . गडकरींची मानसिकता ते आहे देशाचं काम बघत आहेत. टोल, ट्राफिक गर्दी हे टाळण्यासाठी बरेचसे टोल काढलेले आहेत. उड्डाणपूल किंवा इतर काय करता येईल का याची पण चर्चा सुरू आहे. रिंग रोडबाबत लवकरच निर्णय होईल. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील. पुरंदर एअरपोर्टबाबत बैठक झाली आहे. कुठलाही एखादा प्रकल्प करताना लोकांचा विचार करावा लागतो, पुढील अनेक वर्षांचा विचार करून काम करायला लागतं असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.