“महाकुंभातील पाणी स्नानासाठी योग्यच”, प्रदूषण मंडळाची एकाच महिन्यात पलटी; नवा अहवाल काय?

“महाकुंभातील पाणी स्नानासाठी योग्यच”, प्रदूषण मंडळाची एकाच महिन्यात पलटी; नवा अहवाल काय?

Mahakumbh 2025 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) राष्ट्रीय हरित प्राधिकरणाला सादर (NGT) केलेल्या एका अहवालात मोठा दावा केला आहे. विश्लेषणाच्या आधारे प्रयागराजमध्ये महाकुंभादरम्यान (Mahakumbh 2025) संगम ठिकाणी पाणी स्नान करण्यायोग्य होते असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याआधी फेब्रुवारी महिन्यात या उलट अहवाल देण्यात आला होता. मग एक महिन्यात असा कोणता चमत्कार घडला असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. तसेच काल पिंपरी चिंचवड येथील सभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याच गंगेचं पाणी पिण्यास नकार दिला होता. त्यातच असा अहवाल आल्याने नव्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या या (Central Pollution Control Board) अहवालात म्हटले आहे की सांख्यिकीय विश्लेषणाची गरज निर्माण झाली कारण वेगवेगळ्या तिथींवर एकाच ठिकाणी आणि एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणावरून गोळा केलेल्या पाण्याच्या नमुन्यात माहिती बदलती होती. यामुळे नदीच्या पूर्ण क्षेत्रात नदीच्या पाण्याची समग्र गुणवत्ता लक्षात येत नव्हती.

प्रदूषण मंडळाने एकच महिन्यात पलटी

डिसेंबर महिन्यातील आदेशाच्या अनुपालनात 17 फेब्रुवारी रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक रिपोर्ट सादर केला होता. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केलेल्या निरीक्षणात संगमाच्या पाण्यात फेकल कॉलिफॉर्म आणि बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड पातळी स्नानाचे मापदंड पूर्ण करत नाही असे म्हटले होते.

“हड, मी ते पाणी पिणार नाही” राज ठाकरेंचे कुंभमेळ्यातील स्नानाबाबत वादग्रस्त वक्तव्य

महाकुंभात संगम ठिकाणी यमुना आणि गंगा नद्यांतील पाण्याची गुणवत्ता स्नानासाठी आवश्यक असणारे प्राथमिक मापदंड पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. या पाण्यात फेकल कॉलिफॉर्मचे प्रमाण अतिशय जास्त आहे असे या अहवालात म्हटले होते. मंडळाच्या 3 फेब्रुवारीच्या अहवालात म्हटले आहे की सर्व निगराणीच्या ठिकाणी फेकल कॉलिफॉर्मची पातळी 2500 युनिट प्रति 100 मिलिलीटरच्या मर्यादेपेक्षा जास्त होती.

सीपीसीबी अहवालात नवा दावा

28 फेब्रुवारीचा एक अहवाल 7 मार्च रोजी एनजीटीच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने 12 जानेवारीपासून दर आठवड्यात दोन वेळा पाण्याची निगराणी केली. गंगा नदीतील पाच ठिकाणे आणि यमुना नदीतील दोन ठिकाणी तज्ज्ञांच्या समितीमार्फत निगराणी करण्यात आली.

दरम्यान, आता महाकुंभाचे समापन झाले आहे. यावेळी नद्यांतील पाण्यात स्नान करण्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मागील एका अहवालात संगमातील पाणी स्नान करण्यास योग्य नाही असे नमूद करण्यात आले होते. 17 फेब्रुवारी रोजी सीपीसीबीने एनजीटीला सांगितले होते की विभिन्न ठिकाणच्या पाण्याची गुणवत्ता स्नानासाठी ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करत नव्हती.

महाकुंभात वादाचं पाणी! गंगा-यमुनेचं पाणी प्रदुषित, स्नान धोकादायक; अहवालात नेमकं काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube