Download App

जळगावच्या प्रसिद्ध व्यासायिकांवर पुण्यात गुन्हा दाखल: कोट्यावधींची फसवणूक केल्याचा आरोप

Jalgaon crime : जळगाव येथील प्रसिद्ध व्यसायिकांवर पुण्यात तब्बल 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपयांचा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्रमोद भाईचंद रायसोनी, प्रशांत मणिलाल संघवी व संदेश मिश्रीलाल चोपडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत प्रदीप पोपटलाल कर्नावट (चिंचवड) या व्यावसायिकाने आरोपी विरोधात दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 24 मे रोजी भोसरी हद्दीत प्रसन्न गोल्डफिल्डच्या कार्यालयात घडला आहे. सदर आरोपी प्रमोद रायसोनी, प्रशांत संघवी व संदेश चोपडा यांनी एकमेकांशी संगनमत करुन तक्रारदार यांची फसवणुक करण्याच्या उद्देशाने भोसरीतील सेक्टर क्रमांक 11 येथील प्लॉट क्रमांक एकवर एकूण क्षेत्र 4400 चा चौ.मी. या क्षेत्रावर पी 3 डेव्हलर्पस भागीदारी संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या प्रसन्न गोल्डफिल्ड या प्रकल्पातील 62 दुकाने अप्रमाणिकपणे, कपटाने त्यांचे स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदार संस्थेच्या नावे केली आहे.

शरद पवारांना चिडविण्याचे भाजपचे नियोजन : INDIA बैठकीच्या वेळीच अजितदादांचे NDA मध्ये स्वागत

तसेच तक्रारदार यांनी दिनेश पारसकुमार मेहता, संजय मुल्लानचंद कासव, संजय रमणभाई पटेल यांना आगाऊ रक्कम घेऊन दुकाने विक्री केली असताना, आरोपींनी 23/5/2023 रोजी 11 वेगवेगळ्या दस्ताद्वारे करारनामा करुन एकूण 62 दुकाने आरोपींचे स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावे केली आहे. त्यात तक्रारदार यांनी दिनेश पारसकुमार मेहता, संजय मुल्तानचंद कासवा, संजय रमणभाई पटेल यांना विक्री केलेल्या 16 दुकानांचा समावेश आहे.

Mumbai News : मंत्रालयात खळबळ! धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दुसऱ्या मजल्यावरून पाठोपाठ मारल्या उड्या

त्यामुळे आरोपींनी अधिकार नसताना सुमारे 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपये किंमतीचा अपहार करुन एकूण 62 दुकाने, ऑफिसेस स्वत:च्या व्यक्तिगत फायद्यासाठी स्वत:च्या व्यक्तिगत स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावे 11 वेगवेगळ्या दस्ताद्वारे करारनामा करुन तक्रारदार यांची आर्थिक फसवणुक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी भोसरी एसआयडीसी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Tags

follow us