Team India : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील (IND vs AUS) पहिल्या कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवत आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्याची तयारी सुरू झाली आहे. या सामन्यात रोहित शर्मा नेतृत्व (Rohit Sharma) करणार आहे. याच मालिकेदरम्यान टीम इंडियाला धक्का (Team India) देणारी बातमी समोर आली आहे. विराट कोहलीचा जवळचा मानल्या जाणाऱ्या खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून सिद्धार्थ कौल आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.
पहिल्याच डावात टीम इंडियाचा खेळ 150 धावांत आटोपला, ऑस्ट्रेलियाचेही 4 गडी बाद
सिद्धार्थ कौल हा भारतीय संघातील वेगवान गोलंदाज आहे. बऱ्याच दिवसांपासून तो संघाबाहेर आहे. त्याला भारतीय संघासाठी फार क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये सिद्धार्थने 50 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. परंतु, टीम इंडियातील त्याचं करिअर खूप लहान राहिलं. भारतीय संघाकडून त्याने फक्त 3 वनडे सामने खेळले आणि 3 टी 20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात सिद्धार्थने एकूण 4 विकेट्स घेतल्या आहेत.
सिद्धार्थ कौल आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली दोघेही जुने मित्र आहेत. अंडर 19 विश्वचषकात दोघेही एकत्र खेळले होते. आता याच सिद्धार्थने निवृत्तीची घोषणा केली आहे. विराटच्या तुलनेत सिद्धार्थला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार कमी संधी मिळाली. आताही सिद्धार्थ 34 वर्षांचा आहे. त्यामुळे येथून पुढे त्याला संघात संधी मिळण्याची शक्यता दूरपर्यंत दिसत नाही. या गोष्टींचा अंदाज आल्याने सिद्धार्थ कौलने निवृत्तीची घोषणा केल्याचे सांगितले जात आहे.
आता निवृत्ती जाहीर करताना सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, मी लहान असताना पंजाबच्या मैदानात खेळायचो. त्यावेळी देशाचं प्रतिनिधीत्व करावं असं माझं स्वप्न होतं. 2018 मध्ये मला संधी मिळाली. टी 20 सामन्यात 75 आणि वनडे सामन्यात 221 नंबरची टोपी मला मिळाली होती. पण आता या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याी वेळ आली आहे. चाहत्यांनी मला जो पाठिंबा दिला त्यांनी मला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही.