Download App

पहिल्याच डावात टीम इंडियाचा खेळ 150 धावांत आटोपला, ऑस्ट्रेलियाचेही 4 गडी बाद

  • Written By: Last Updated:

India VS Australia 1st Test Score Updates : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात (India VS Australia) आज पहिला टेस्ट सामना सुरु आहे. या टेस्ट सामन्यात टीम इंडियाची मात्र पोलखोल झालीय. टीम इंडियाचा संघ अवघ्या 150 धावांत ऑल आऊट झालाय. तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजांनी मात्र गुडघे टेकवल्याचं समोर (cricket) आलंय. नितीश कुमार रेड्डी याने टीम इंडियाकडून सर्वाधिक धावांची खेळी केलीय. त्याने एकूण 41 धावा केल्या आहेत.

भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा अद्याप ऑस्ट्रेलियात न आल्याने बुमराह भारताचे नेतृत्व करत आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. फलंदाजीच्या क्रमवारीतील अव्वल चारपैकी तीन खेळाडू एकाच अंकात बाद झाल्याने कसोटीतील भारतीय फलंदाजांचा संघर्ष सुरूच होता.

नाशिक पश्चिममध्ये मतदान यंत्र अन् व्हीव्हीपॅटमध्ये बदल; ठाकरे गटाच्या नेत्याची निवडणूक आयोगात धाव

जैस्वाल शून्यावर बाद झाले तर अनुभवी विराट कोहली 5 धावांवर बाद झाला. रोहितच्या जागी फलंदाजी क्रमवारीत ढकललेल्या केएल राहुलने 74 चेंडूत 26 धावांची संयमी खेळी खेळली. ऋषभ पंतने 37 धावा केल्या. नितीश रेड्डी हा भारतीय संघातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला, कारण त्याने 59 चेंडूत 41 धावा केस्या. ऑस्ट्रेलियासाठी जोश हेझलवूड सर्वोत्तम गोलंदाज ठरला, त्याने 4 बळी घेतले.

मतमोजणी अवघ्या काही तासांत, प्रशासन सज्ज; अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक फेऱ्या कुठे होणार?

पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाने 19 धावांवर तिसरा विकेट गमावला आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथला LBW बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाने 33 धावांवर चार विकेट गमावल्या आहेत. जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे कंबरडे मोडलं आहे. बुमराहने आपल्या धोकादायक गोलंदाजीने कहर केलाय. ऑस्ट्रेलियन डावात उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी आणि स्टीव्ह स्मिथ यांना बाद केलंय. नॅथन मॅकस्विनी आणि स्टीव्ह स्मिथला लागोपाठ दोन चेंडूंवर बाद करण्यात बुमराहला यश आले.

 

follow us