Bajrang Punia ban : हरियाणाचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्यावर (Bajrang Punia) मोठी कारवाई करण्यात आली आहे. बजरंग पुनियावर चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. या कारवाई मागील कारणही समोर आलं आहे. पुनियाने युरिन सॅम्पल देण्यास नकार दिला होता त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने टोकियो ऑलिम्पिक्समधील कांस्यपदक विजेत्या पुनियावर अँटी डोपिंग पॅनलने नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. या नियमांतर्गत बजरंग पुनिया दोषी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
Vinesh Phogat : विनेश फोगटला धक्का, पदक मिळणार नाही, CAS ने याचिका फेटाळली
याच गोष्टीसाठी NADA ने 23 एप्रिल रोजी बजरंग पुनियाला निलंबित (Haryana News) केलं होतं. त्यानंतर वर्ल्ड गव्हर्निंग बॉडीने देखील त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर बजरंग पुनियाने प्रोव्हिजनल सस्पेन्शनविरोधात अपील केले होते. मात्र नाडाच्या डोपिंग पॅनलच्या शिस्तपालन समितीने 31 मे रोजी त्याचं निलंबन रद्द केलं होतं.
यानंतर मात्र 23 जून रोजी नाडाने पुनियाला या आरोपांची माहिती दिली होती. पुनियाने मात्र 11 जुलै रोजी या विरोधात आव्हान दिलं होतं. याची सुनावणी 20 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी झाली. बजरंग पुनियाने ऑक्टोबर महिन्यात शेतकरी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली होती. याआधी त्याने कुस्तीपटू विनेश फोगाट बरोबर राजकारणार पदर्पण केलं होतं.
विनेश फोगटने मारलं राजकीय मैदान; भाजप उमेदवाराचा दारुण पराभव करत झाली आमदार