Download App

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या रात्रीपासून 22 तास ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा बंद

लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचं काम गुरूवार (दि. २८ नोव्हेंबर २०२४)रोजी रात्री

  • Written By: Last Updated:

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. (Mumbai Water) मुंबईतील जी दक्षिण व जी उत्तर विभागातील जलवाहिनी दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नगरकरांनो लक्ष द्या! पाणीपुरवठा होणार खंडीत, कारण

ही दुरुस्ती गुरूवार (दि. २८ नोव्हेंबर २०२४)रोजी रात्री १० वाजेपासून शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेदरम्यान मुंबईतील जी दक्षिण व जी उत्तर विभागातील जलवाहिनी दुरूस्ती कारणाने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. २२ तासांच्या दुरूस्ती कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे महानगरपालिकेचे आवाहन करण्यात आले आहे.

जलवाहिनी दुरुस्तीचं काम

लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचं काम गुरूवार (दि. २८ नोव्हेंबर २०२४)रोजी रात्री १० वाजेपासून शुक्रवार (दि. २९ नोव्हेंबर २०२४)रोजी रात्री ८ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. आसपासच्या विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णत:, तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.

कोणत्या विभागांत पाणीपुरवठा बंद?

करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ०४.३० ते सकाळी ०७.४५) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील. जी दक्षिण विभाग : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी ०२.३० ते दुपारी ०३.३०) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी ०३.३० ते सायंकाळी ०७.००) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी उत्तर विभाग

सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी ०३.३० ते सायंकाळी ०७.००) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी उत्तर विभाग

सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ०७.०० ते रात्री १०.००) पाणीपुरवठा अंशत: बंद राहील. (३३ टक्के)

follow us