लाडक्या बहिणींना खुशखबर! सरकार ‘या’ दिवशी देणार 2100 रुपये; काय ठरलं?

आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. 2100 रुपये कधी जमा होणार याबाबत महत्वाची माहिती मिळाली आहे. 

Ladki Bahin Scheme

Ladki Bahin Scheme : राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकारने अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची मोहीम सुरू केली आहे. अपात्र लाभार्थीही स्वतःहून लाभ नाकारत आहेत. त्यामुळे या योजनेतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. सध्या या योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. परंतु, निवडणूक काळात 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. 2100 रुपये कधी जमा होणार याबाबत महत्वाची माहिती मिळाली आहे.

मोठी बातमी! ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले, वाचा नेमकी कारणे काय?

राज्य सरकारने आगामी अर्थसंकल्पाची तयारी केली आहे. अर्थमंत्री अजित पवार 1 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करतील. याच वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते. लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली जाणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यानुसार या योजनेबाबत अर्थमंत्री पवार मोठी घोषणा करू शकतात.

धुळ्यात 14 हजार बहिणींचे अर्ज रद्द

सध्या या योजनेतून अनेक महिला स्वतःहून माघार घेत आहेत. धुळे जिल्ह्यात 20 महिलांनी लाभ नाकारला आहे. अंगणवाडी स्तरावरून सदर अर्ज महिला व बालविकास विभागाला मिळाले आहेत. धुळे जिल्ह्यात या योजनेत महिला लाभार्थ्यांची संख्या 5 लाख 40 हजार इतकी आहे. या महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. पण आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. विविध कारणांमुळे यातील 14 हजार 733 महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वय, अर्जात त्रुटी तसेच अन्य कारणांमुळे हे अर्ज रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

लाडकी बहीण योजना जुलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जात होते. आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते वितरित करण्यात आले आहेत. फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, विरोधकांकडून या योजनेवर टीका सुरू झाली. यामागे कारणही आहे. योजनेसाठी अर्ज करताना सरकारी यंत्रणांनी निकषांकडे लक्ष न देता सरसकट अर्ज मंजूर केले होते.

दरम्यान, या योजनेच्या पात्रतेसाठी निकषांची चाळणी लावण्यात आली आहे. आदिती तटकरेंनी याची माहिती दिली. अपात्रतेच्या निकषांनुसार, संजय गांधी निराधार योजनेच्या 2,30,000 महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आलेय. याशिवाय, 65 वर्षांवरील 1,10,000 महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती महिल बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती. आता या अपात्र संख्येत आणखी वाढ झाली आहे.

लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना मिळाले 450 कोटी; धक्कादायक माहिती उघड..

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube