Mumbai Water Supply : मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट, पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जेमतेम साठा शिल्लक

Mumbai Water Supply : मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट, पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जेमतेम साठा शिल्लक

Mumbai Water Supply : यंदा जूनचा दुसरा आठवडा उलटून गेला तरी देखील राज्यात मान्सूनच्या पावसाची (monsoon rains)चिन्हे नाहीत. 11 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून कोकणात स्थिरावला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल तूर्तास थांबली असून तो आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. त्यामध्ये आता राज्याची राजधानी मुंबईवर पाणी कपातीचं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे मुंबईरांनी पाणी जपून वापराव अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. ( Water deduction in Mumbai Water Supplier dam has barely stock left )

पवारांना मी धमकी दिली नाही; सुप्रिया सुळें अन् रोहित पवारांविरोधात मानहानीचा दावा करणार : सौरभ पिंपळकर

8 जून ला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व साखळी तलाव/धरण मिळून 11% पाणी साठा शिल्लक होता. येत्या 22 जून पर्यंत हा साठा जेमतेम 5 % पातळीवर असेल. तर हा पाणीसाठा केवळ पुढील 48 दिवस पुरेल एवढाच आहे. त्यामुळे त्यापुढे प्रत्येक थेंब जपून वापर करावा लागेल. अद्यापही राज्य सरकारचं याकडे लक्ष नाही. बाकी पुढील 7/8 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील तरी दिसत नाही. त्यामुळे आता जून अखेरीस शहरात पाणी कपात करण्याची शक्यता आहे.

Adipurush च्या रेकॉर्डब्रेक कमाईमागे तुमचाही फायदा होणार! जाणून घ्या गणित…

दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व साखळी तलाव/धरण मिळून 11% पाणी साठा शिल्लक असल्याने मुंबई महानगर पालिकेने राज्य सरकारला या धरणांमधील पाणीसाठा राखीव ठेवण्यात यावा अशी मागणी केली आहे. ती मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मुंबईरांना पाणी जपून वापरावं लागणार एवढं नक्की

मान्सूनवर या धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणे अवलंबून आहे. मात्र बाकी देशाचे हवामान खात्याचे पाऊस / मॉन्सूनबद्दलचे सगळे भाकीत चुकीचे ठरले आहे. तर राज्यात 11 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून कोकणात स्थिरावला आहे. रखडलेला मान्सूनचा प्रवास 23 जूनपासून पुन्हा सुरळीत होऊ शकेल. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील उर्वरित मोठ्या शहरातील शिल्लक पाणी उपलब्धते बद्दलची माहिती कोठेही नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube