Adipurush च्या रेकॉर्डब्रेक कमाईमागे तुमचाही फायदा होणार! जाणून घ्या गणित…
Adipurush Movie PVR INOX : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा बहुचर्चित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Adipurush Tickets Price) रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंग एक लाखाहून जास्त तिकीटांची विक्री झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हा चित्रपट रेकॉर्डतोड कमाई करू शकतो. पण आदिपुरूषबरोबर तुम्हाला देखील कमाई करण्याची संधी आहे. पण तुम्ही म्हणाल ही संधी नेमकी काय आहे? ( Adipurush Movie effect on PVR INOX stock )
भाजप-उद्धव ठाकरे दोस्ती पुन्हा होणार का? बावनकुळेंनी एकाच वाक्यात विषय संपवला
कारण ‘आदिपुरुष’या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई करण्याची शक्यता असून तसं झाल्यास पीवीआर आयनॉक्सच्या शेअरवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीव्हीआरच्या शेअरची किंमत वाढण्याची शक्यता आहे. कारण ‘आदिपुरुष’च्या अॅडव्हान्स बुकिंगनंतर पीव्हीआरच्या शेअरमध्ये पॉझिटिव्ह मुव्हमेन्ट पाहायला मिळत आहे. मात्र या शेअरमध्ये आज 1.15 टक्के घसरण देखील झाली.
समान नागरी कायद्यासाठी केंद्राने मागवली मते, 30 दिवसांच्या आत ‘ह्या’ लिंकवर म्हणणे मांडा
सध्या या शेअरची किंमत 1481 रूपायांच्या आसपास आहे.तर येणाऱ्या काळात त्याची किंमत 1879 होण्याची शक्यता आहे. ब्रोकर्सच्या सांगण्यानुसार या शेअरने गेल्या आठवड्यात 7 टक्के रिटर्न्स दिले आहे. तर येणाऱ्या काळात तो 27 टक्के रिटर्न्स देण्याची शक्यता आहे.
आदिपुरुषची कमाई अन् पीव्हीआर आयनॉक्स शेअरचं कनेक्शन :
कोरोनानंतर गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले आहेत. त्यात अनेक चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामध्ये शाहरूखचा पठाण, अजय देवगनचा दृश्यम, त्यानंतर आता आदिपुरुष बक्कळ कमाई करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर काही चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये कार्तिक आर्यनचा सत्यप्रेम की कथा, सनी देओलचा गदर 2, अक्षय कुमारचा OMG2 यांचा समावेश आहे. तर पीवीआर आयनॉक्स ही एक मल्टीप्लेक्स थिएटर कंपनी आहे. हे चित्रपट त्यांच्या देशभरातील थिएटरमध्ये रिलीज होत असतात. त्यांच्या कमाईमुळे या कंपनीच्या शेअरवर परिणाम होत असतो.