उद्धव ठाकरेंसाठी आमचे सर्व दरवाजे बंद; भाजप नेत्याच्या ‘त्या’ ऑफरवर बावनकुळेंचा खुलासा

BJP Chandrashekhar Bawankule Uddhav Thackray

Chandrashekhar Bawankule : शिंदे गटाच्या जाहिरातीवरून सुरू झालेला तणाव काहीसा निवळत असतानाच राजकीय नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवरून नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे गटाच्या मंत्र्याने अजित पवार (Ajit Pawar) यांना ऑफर दिली तशी काल भाजपच्या मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरे यांना मैत्रीची ऑफर दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या घडामोडींवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य काल मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं उघडीच आहेत असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, केशव प्रसाद मौर्य यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत आहे. उद्धव ठाकरेंकरता आमचे सर्व दरवाजे बंद आहेत. आम्ही त्यांच्याशी कोणतीही चर्चा करत नाही. त्यांच्याशी कधीही, कुठलीही चर्चा करणारच नाही.

कुरघोड्यामुळे राष्ट्रवादी सोडली; बीआरएसमध्ये जाताच शेलारांनी राहुल जगतापांना घेरले !

यानंतर त्यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयांवर कडाडून टीका केली. कर्नाटकमधील सरकारने जे काही केलं आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. किमान त्यांच्या मुखपत्रातून तरी त्यांनी याबाबत भूमिका उद्या छापली पाहिजे. कर्नाटक सरकारने धर्मांतरविरोधी कायदा रद्द केला आहे. तसेच अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही धडा वगळला आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर बावनकुळे यांनी टीका केली.

काय म्हणाले होते मौर्य ?

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही असेल तर ते त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडावे. भाजपाचे दरवाजे बंद नाहीत. मात्र, ठाकरेंनी आता पुढाकार घेतला पाहिजे. चर्चा केली पाहिजे. भाजप स्वतःहून चर्चेचा प्रस्ताव ठेवणार नाही.

Tags

follow us