कुरघोड्यामुळे राष्ट्रवादी सोडली; बीआरएसमध्ये जाताच शेलारांनी राहुल जगतापांना घेरले !

  • Written By: Published:
कुरघोड्यामुळे राष्ट्रवादी सोडली; बीआरएसमध्ये जाताच शेलारांनी राहुल जगतापांना घेरले !

Ghanshyam Shelar: श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar) यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएस (BRS) पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये घुसमट होत होती. काही जण पक्षात राहून पक्षाचे नुकसान करत होते. माझ्याविरोधात कुरघोड्या करत होते. पण पक्षामध्ये त्यांनाच महत्त्व दिले जात असल्याचा आरोप घनश्याम शेलार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांच्यावर शेलार यांनी निशाणा साधला आहे.(brs-ghanshyam-shelar-speak-against-rahul-jagtap)

शेलार म्हणाले, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची पक्षामध्ये कदर नाही. पक्षाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत होते. तरीही मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलत जात असल्याचे जाणवले आहे. माझ्या कामाची दखल घेतली जात नव्हती. वरिष्ठांची बोललो अनेकवेळा यावर चर्चा झाली आहे. उलट पक्षाविरोधात काम करणारे, दुसऱ्या पक्षाशी जवळीक साधणाऱ्यांवर पक्ष कारवाई करत नाही. उलट त्यांना संधी देतो, असा आरोपही शेलार यांनी केला आहे.

अहमदनगर शहरातील पारिजात चौकात दुकानांना आग; अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

मी शरद पवारांविषयी एकही शब्द बोललो नाहीत. तसेच मी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर काही एक बोललो नाही. तसेच माझी त्यांच्याविष्यी काही एक तक्रार नाही. माझी स्थानिक नेत्यांविषयी तक्रारी असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

ST चा प्रवास आणखी सुखकर होणार; महामंडळाने आणलं तिकीट बुकींगसाठी अ‍ॅप

बीआरएस पक्षाचे काम खूप चांगले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. म्हणूनच अनेक कार्यकर्ते या पक्षात सहभागी होत आहे. कोणी आगामी निवडणुकीसाठी दावेदारी केली म्हणून मी पक्ष सोडला नाही.आगामी निवडणुकीसाठी बीआरएस जी जबाबदारी देईल ती स्वीकारणार आहे. माझ्यावर आजवर अनेक केसेस झाल्याय
मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आजवर आंदोलन केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी माझी नेहमी भूमिका असायची मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे दिसून येत असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube