ST चा प्रवास आणखी सुखकर होणार; महामंडळाने आणलं तिकीट बुकींगसाठी अॅप
Maharashtra ST : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस म्हणजे एसटी बसने ही राज्यातील सर्वसामान्यांपासून सर्वांचीच प्रवासाची प्रधान्यता असते. एसटीला लालपरी म्हणून देखील ओळखले जातं. गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी या तत्वाखाली एसटीने गेली 75 वर्ष राज्यात कार्यरत आहे. तर एसटीच्या संप काळामध्ये राज्यातील जनजीनव विस्कळीत झाल्याचं देखील सर्वांनी अनुभवलं आहे. त्यानंतर आता एसटीने प्रवास करणे आणखी सुखकर होणार आहे. कारण आता एसटीचं तिकीट बुकींग केवळ वेबसाईटच नाही तर अॅपवरून देखील करता येणार आहे.( Maharashtra ST launch App for Ticket Booking )
एसटीने लांब पल्ल्याचा प्रवास करताना अनेकदा बसायला जागा न मिळाल्याने त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी अनेक प्रवासी आगाऊ तिकीट बुकींग करायला प्रधान्य देतात. त्यासाठी एसटी महामंडळाच्या वेबसाईटचा वापर केला जातो. मात्र या वेबसाईटला अनेकदा तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यावर आता एसटी महामंडळाने उपाय शोधला आहे. प्रवाशांना आता आगाऊ तिकीट बुकींग करण्यासाठी आपल्या हातातील मोबाईल फोनमधील अॅपद्वारे आगाऊ तिकीट बुकींग करता येणार आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यावस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एका कार्यक्रमात माहिती दिली.
‘आप’ची काँग्रेसला भन्नाट ऑफर! ‘त्या’ निवडणुकीतून माघार घ्या मग, आम्ही सुद्धा…
वेबसाईटला अनेकदा तांत्रिक अडचणी :
सध्या आगाऊ तिकीट बुकींग करण्यासाठी एसटी महामंडळाच्या वेबसाईटचा वापर केला जातो. मात्र या वेबसाईटला अनेकदा तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामध्ये कधी प्रवाशांच्या खात्यावरून पैसे जात होते. तर कधी जागा देखी आरक्षित होत नव्हती. त्यानंतर खात्यावरून गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी प्रवाशांना हेलपाटे देखील मारावे लागत होते. तर अनेकांना वेबसाईट बंद असल्याच्या देखील समस्या येत होत्या.
नवं अॅप कसं असणार?
एसटी महामंडळाने आता आणलेल्या अॅपवर प्रवासी केवळ क्रेडिट-डेबिट कर्डच नाही तर ऑनलाईन पेमेंट्स म्हणजे युपी आय पेमेंटवरून ही पैसे भरता येणार आहेत. तसेच यावरून तुम्ही बुकींग केलेली बस कुठे आहे. हे देखील चेक करता येणार आहे. त्यामुळे बसची वाट पाहण्यापेक्षा वेळेत बस पकडता येणार आहे. महामंडळाच्या 11 हजार बसेसला ही सुविधा असणार आहे.