अहमदनगर शहरातील पारिजात चौकात दुकानांना आग; अग्निशामक दल घटनास्थळी दाखल
अहमदनगर : नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या पारिजात चौकात असलेल्या दुकानांना (Shops on fire) आज (शुक्रवारी) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire Department)कळविले. सध्या अग्निशमन विभागाच्या बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. (Shops fire at Parijat Chowk in Ahmednagar city; Firefighters rushed to the spot)
https://www.youtube.com/watch?v=Yc2Q59LsL1s
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरमधील गुलमोहर रोडवरील पारिजात चौकात दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. दुपारी या दुकानांच्या जवळ असलेल्या जागेत कचरा पेटवल्यामुळे आग लागली असावी, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. कचरा पेटवल्यानंतर वाऱ्यामुळे जळत असलेला कचरा दुकानांजवळ येऊन दुकानांना आग लागली, असे सांगण्यात येत आहे. दुकाने एकमेकांना लागूनच असल्याने या भीषण आगीत अनेक दुकाने आगीच्या विळख्यात सापडली.
पाहता पाहता आगीने भीषण रुप धारण केलं. या आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, दुकानांना लागलेल्या आगीचे दाह आजूबाजूच्या परिसरात जाणवत होते. धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. ही आग पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आगीच्या ज्वाळांचे लोट पाहून तेथील लोकांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक व पोलीस मदत कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीत तीन ते चार दुकानांचे मोठे नुकसान झाले. यात भंगार, कुशन व फर्निचर दुकानांचा समावेश आहे. आगीच्या या दुर्घटनेत दुकानीतील बरेच साहित्य जळून खाक झाल्याने दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, आग अद्यापही मोठ्याप्रमाणात धुमसत असून सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.