Mumbai News: कपोल विद्यानिधी शाळेत अजान लावल्याने पेटला वाद; शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक, कारवाईची मागणी

Mumbai News: कपोल विद्यानिधी शाळेत अजान लावल्याने पेटला वाद; शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक, कारवाईची मागणी

Mumbai News : मुंबईमधील कांदिवली भागातील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये आज सकाळी प्रार्थना झाल्यानंतर अजान (Azan) लावण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. काही पालकांनी यावर आक्षेप घेतला आहे. (kandivali) तसेच शिवसेनेने त्या शाळेविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सोबतच या शाळेने अशाप्रकारे लाऊड स्पीकर अजान यापुढे लावू नये, असे पत्र शिवसेनेकडून देण्यात आला आहे. दरम्यान ज्या शिक्षिकेने अजान लावली, पहिला त्या शिक्षकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती शाळेकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वादावर पहिल्यांदा शाळेची बाजू देखील जाणून घेतली. शाळेच्या म्हणण्यानुसार, “शाळेत प्रत्येक धर्माच्या प्रार्थना विद्यार्थ्यांना समजावे म्हणून आम्ही त्या लाऊड स्पीकरवर लावतो.

परंतु त्यामध्ये गायत्री मंत्र असेल, कॅरोल सिंगिंग असेल किंवा मग इतर धर्मियांच्या प्रार्थना असतील त्या विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी हा उपक्रम राबवण्यात असतो. यामध्ये लाऊड स्पीकर अजान लावण्यात आली. मात्र पालकांच्या भावना लक्षात घेता, आम्ही अजान बंद करण्यात आली. पालकांचं म्हणणं ऐकून घेत यापुढे अशाप्रकारे आम्ही शाळेत अजान लावणार नाही, असे आम्ही सर्वांना आश्वासन देत आहोत.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार शाळेत जाणीवपूर्वक अजान लावली असल्याचे सांगितले जात आहे. अजान लावणारे शिक्षक अल्पसंख्याक आहे. यामुळे जाणीवपूर्वक त्याचं नाव समोर आणले नाही. संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्ते आणि पालकांनी केली आहे. त्याला समोर आणा, माफी मागायला सांगा आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही असं आश्वासन द्या, अशी मागणीला सध्या जोर धरत आहे.

आम आदमी विमा योजनेचा लाभ कसा मिळवावा?

या सगळ्या वादामुळे शाळेबाहेर मोठा गोंधळ बघायला मिळत होता. खबरदारी म्हणून पोलीस देखील शाळेत दाखल झाले आहेत, शाळेबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच यामध्ये महिला पोलिसांचा देखील समावेश आहे. हा सगळा हिंदूंचा परिसर आहे. इथे अजान लाऊड स्पीकरवर का लावण्यात आली? आज शुक्रवार आहे, यामुळे शाळेमध्ये अजान लावली का?

हे काम कोणी केलं आहे? हा उपक्रम कशासाठी? हिंदू शाळेमध्ये आजान का लावण्यात आली? असे अनेक सवाल भाजप आमदार योगेश सागर यांनी उपस्थित करत आहेत. तसेच ज्यांनी ही अजान लावली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड करायला हवं. कारवाई झालीच पाहिजे, त्याशिवाय आंदोलन शांत होणार नाही, असंही योगेश सागर यांनी इशारा दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube