नगरकरांनो लक्ष द्या! पाणीपुरवठा होणार खंडीत, कारण…

नगरकरांनो लक्ष द्या! पाणीपुरवठा होणार खंडीत, कारण…

Ahmednagar : महावितरणकडून विद्युत वाहिनीच्या कामांच्या दुरुस्तीसाठी उद्या (ता. ७) शटडाऊन घेतला जाणार आहे. परिणामी मुळा नगर व विळद येथील वीज पुरवठा दुरुस्तीसाठी खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

तोंडाला मस्क लावून घरात नोटा मोजत होते, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

शनिवार ७ ऑक्टोबर रोजी, बोल्हेगाव, नागापूर, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात सकाळी 11 नंतर पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबली

रविवार ८ ऑक्टोबर रोजी, बोल्हेगाव सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सावेडी आदी भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

‘मन मतलबी’ गाण्यातून उलगडणार मनातील व्यथा; ‘Short And Sweet’ सिनेमातील गाणं प्रदर्शित

नगर शहरातला पाणीपुरवठा रविवार दि.08 रोजी सुरु करण्यात येणार आहे. दि.08 रोजी रोटेशनप्रमाणे शहराचा मध्यवर्ती भाग म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी इत्यादी भागात महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा बंद असणार आहे. या भागातील पाणीपुरवठा हा दि.09 रोजी सुरु करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

यासोबतच दि.09 रोजी होणारा पाणी पुरवठाही दि. 10 रोजी करण्यात येणार आहे. दि. 9 रोजी शहरातील शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर इत्यादी भागात पाणीपुरवठा होत असतो मात्र, हा पाणी पुरवठा दि.10 रोजी करण्यात सुरु करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube