Dhananjay Munde X Post on Anjali Damania : राजकीय वर्तुळात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झडत आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी हे प्रकरण उचलून धरत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्यात आज अगोदर दमानियांची पत्रकार परिषद आणि त्यावर मुंडेनी देखील पत्रकार परिषद घेतली मात्र त्यांचे हे परिषदांचे सत्र आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणे सुरूच आहे.
मोदींकडून लोकसभेत ‘जकूजी’ चा उल्लेख; नेमका प्रकार काय? घ्या समजून…
अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 4, 2025
आता मुंडे यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडीया साईटवर पोस्ट करत दमानियांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.
एक AI म्हणजे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ तर, दुसरं AI ‘अॅस्पिरेशन इंडिया’
दरम्यान दमानियांनी मागच्या सरकारमध्ये मुंडे कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना दमानिया म्हणाल्या की, एक कृषीमंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, हे मी पुराव्यानिशी सांगणार असल्याचे सांगत वर्षभराच्या काळात धनंजय मुंडेंनी 275 कोटींचे पाच घोटाळे केल्याचा गंभीर आरोपही दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर केला.