एक AI म्हणजे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ तर, दुसरं AI ‘अॅस्पिरेशन इंडिया’
PM Modi हे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' वर बोलत होते.

Parliament Budget Session 2025 PM Modi on AI संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliament Budget Session 2025) आज चौथा दिवस आहे. यावेळी पंतप्रधान मोदी (PM Modi) संसदेत बोलत होते. यावेळी त्यांनी ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ वर बोलताना म्हटले की, लोक फॅशन म्हणून ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ म्हणजेच AI वर बोलतात पण आम्ही त्यावर गतीने काम करत आहोत.
अहिल्यानगर नामांतर याचिकेत प्रशासनाने सक्षम भुमिका घ्यावी; आमदार संग्राम जगताप
त्याचबरोबर यावेळी विरोधकांना टोला लावत मोदी म्हणाले की, लोक फॅशन म्हणून ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ म्हणजेच AI वर बोलतात पण आम्ही त्यावर गतीने काम करत आहोत. तसेच AI माझ्यासाठी दोन प्रकारचं आहे. एक AI म्हणजे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ तर, दुसरं AI ‘अॅस्पिरेशन इंडिया’ ज्यातून भारतीयांच्या स्वप्नरपूर्तीची पायाभरणी होणार आहे.
खरे ‘बदनामिया’ धनंजय मुंडेचं; दादागिरी ते हडपलेली जमीन, दमानियांचं सडतोड प्रत्युत्तर
तसेच ते पुढे म्हणाले की, आम्ही न्यूक्लिअर एनर्जी सेक्टर खुला केला आहे. याचे देशाला दुरगामी सकारात्मक परिणाम पहायला मिळणार आहे. AI 3D प्रिंटींग आणि व्हर्चुअल रियालिटीसह आम्ही गेमिंगमध्येही प्रयत्न करत आहोत. शाळांमध्ये टिंकरिंग लॅब सुरू केल्या आहेत. त्यातून शिकलेले मुलं रोबोटीक शिकून लोकांना चकित करत आहेत. असंही मोदी म्हणाले.
‘गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन’, पंतप्रधान मोदींनी साधला राहुल गांधींवर निशाणा
तसेच यावेळी पीएम मोदींनी राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन करून जे लोक समोर येतात, त्यांना संसदेत गरिबांबद्दल बोलणे कंटाळवाणे वाटेल. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.