स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी हे खाद्य; पंकजा मुंडेंची प्राजक्ता माळींच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या दरम्यान

स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी हे खाद्य; पंकजा मुंडेंची प्राजक्ता माळींच्या समर्थनात पोस्ट व्हायरल

स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी हे खाद्य; पंकजा मुंडेंची प्राजक्ता माळींच्या समर्थनात पोस्ट व्हायरल

Pankaja Munde on Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव धनंजय मुंडे यांच्यासोबत (Prajakta Mali) जोडलं गेल्यानंतर प्राजक्ताने संताप व्यक्त केला. पत्रकार परिषद घेऊन तिने तिची भूमिका मांडली. तसंच, तिच्यावर चिखलफेक करण्याऱ्यांनी माफी मागावी, असं आवाहनही केलं. तिच्या भूमिकेनंतर तिच्या समर्थनार्थ अनेकजण उतरले आहेत. आता, मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्राजक्ताच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे.

धनुभाऊ बोगस मतांनी जिंकले अन् पंकजा मुंडे , मूक मोर्च्यात सुरेश धसांची तुफान फटकेबाजी

पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘शक्ती’ शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेवही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. ‘दुर्दैवी घटना’हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.

त्या पुढे म्हणाल्या, भावना कुठे आहेत? चिमुकल्यांवर बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना. पण कायद्याने, नियमाने! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक. दुर्दैवाने स्त्री आणि तिचं सत्व सॉफ्ट टार्गेट आहे. काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. Be strong n make us proud you all. असं त्या म्हणाल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या दरम्यान भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच, धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला. आपपासांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये, अशा शब्दांत भूमिका स्पष्ट करणाऱ्या प्राजक्ताने धस यांनी आपली जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या वादंगादरम्यान आमदार सुरेश धस यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींसह माळीचेही नाव घेत टिप्पणी केली होती.

Exit mobile version