Download App

डिजेवाल्यांचा बाजार उठणार ! डिजेबंदी करत मुंबई हायकोर्टाचा दणका

Mumbai High Court : तो आदेश आहे डिजेबंदीचा. हा आदेश गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी आहे की सर्वच मिरवणुकीसाठी आहे हेच आपण जाणून घेऊया

  • Written By: Last Updated:

Ganeshotsav DJ banned Mumbai High Court : अवघ्या काही दिवसांवर गणशोत्सव आलाय. या गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) मिरवणुकीसाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची आतापासूनच तयारी सुरू आहे. पण तुम्ही मिरवणुकीची तयारी करत असाल. डिजे, डॉल्बी सिस्टिमची (DJ) बुकिंग करत असाल तर जरा थांबा. कारण मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) डिजेबाबत एक महत्त्वाचा आदेश राज्य सरकारला दिलाय. तो आदेश आहे डिजेबंदीचा. हा आदेश गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी आहे की सर्वच मिरवणुकीसाठी आहे हेच आपण जाणून घेऊया. (Ganeshotsav DJ banned Mumbai High Court)

पूर्वी गणेशोत्सव, कुठलाही सण उत्सव, मिरवणुका असल्या की ढोलताशा, बॉंजो, ढोलपथक लावले जात होती. परंतु काही वर्षांपासून सर्रासपणे डिजे लावला जात आहे. त्यामुळे डिजेसमोर नाचणाऱ्यांचे जीवही गेले आहेत. तर कर्णकश डिजेच्या आवाजामुळे अनेकांना बहिरेपणा आलेला आहे. त्यानंतर मिरवणुकीसाठी सर्रास डिजे लावले जात आहेत. शहरापासून ते ग्रामीण भागात रोजगार म्हणून डिजेची संख्याही वाढलीय. प्रश्न डिजेच्या संख्येचा नसून, त्याच्या आवाज मर्यादेचा आहे.

रहिवासी क्षेत्रानुसार आवाजाची मर्यादा किती ?
काही वर्षांपूर्वी मिरवणुकीतील डिजेंसाठी आवाजाची मर्यादा घालून दिली होती. परंतु त्यानुसार रहिवासी, शांतता, व्यावसायिक असे तीन क्षेत्र करण्यात आले होते. त्यानुसार रहिवासी भागात 45 डेसिबल, शांतता क्षेत्र म्हणजे शाळा, महाविद्यालये, रुग्णालये या भागात 40 डेसिबल, तर व्यावसायिक परिसरात 65 डेसिबलच्या आवाजाची मर्यादा घालण्यात आलेली आहे.


डिजे, डॉल्बीची बंदी मुंबईपुरतीच

परंतु एखादे व्यक्ती मोठ्याने ओरडली तरी या मर्यादेचे उल्लंघन होते. त्यामुळे साहजिकच किती हळू आवाजाच डिजे वाजविला तरी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होत होते. त्यामुळे पोलिस डिजेंवर कायदेशीर कारवाई करत साहित्य जप्त करत होते. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानुसार, गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बी वाजवण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी सध्या तरी केवळ मुंबई शहरापुरतीच आहे. परंतु भविष्यात ही बंदी राज्यभर लागू होईल, असे कायदेतज्ञ्ज्ञांचे मत आहे.

डिजे वाजविल्यास गुन्हे, साहित्य जप्त होणार
गणेशोत्सवासह इतर मिरवणुकीत डिजे वाजविल्यास न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित मंडळावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच डिजे साहित्य जप्त केले जाणार आहे. नवीन बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यास कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशन आणि कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतील.

मिरवणुकीसाठी बंदी…पण एका जागेवर वाजविता येणार

डिजेची ही बंदी सर्वच प्रकारच्या मिरवणुकीसाठी आहे. राजकीय, धार्मिक या मिरवणूक यात येत आहे. परंतु आवाजाची मर्यादा पाळून, डिजेची परवानगी घेऊन बंदीस्त हॉलमध्ये एकाच ठिकाणी डिजे मात्र वाजविता येणार
आहे.

मिरवणुकीत डिजेला बंदी असली तरी पारंपरिक वाद्य मनसोक्त वाजविता येणार आहे. त्यात ढोलपथक, ढोल-ताशा असे पांरपारिक वाद्य वाजविता येणार आहे. त्यामुळे पांपरिक वाद्यकलाकारांना चांगले दिवस येतील. पण लाखो रुपये खर्च करून डिजे व्यवसाय करण्यांचा मात्र या निर्णयाने बाजार उठणार आहे नक्की.

follow us