Video : दुकानाबाहेर ‘गोंधळ घालू नका’ म्हणताच मालकाला केली धक्काबुक्की; व्हिडिओ झाला व्हायरल

वाघोली परिसरात औषध दुकाना बाहेर गोंधळ घालणाऱ्यांना इथे गोंधळ घालू नका असं म्हणल्याने चौघांनी दुकान मालकाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.

Video : दुकानाबाहेर 'गोंधळ घालू नका' म्हताच मालकाला केली धक्काबुक्की; व्हिडिओ झाला व्हायरल

Video : दुकानाबाहेर 'गोंधळ घालू नका' म्हताच मालकाला केली धक्काबुक्की; व्हिडिओ झाला व्हायरल

Shopkeeper Beaten In Wagholi :  वाघोली परिसरात औषध दुकाना बाहेर गोंधळ घालणाऱ्यांना इथे गोंधळ घालू नका असं  म्हणल्याने चौघांनी आत येवून दुकान मालकाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. (Beaten ) हा प्रकार केसनंद फाट्यावर घडला आहे. या प्रकरणी अदखल पात्र गुन्हा लोणीकंद पोलिसांत दाखल (Wagholi) करण्यात आला आहे.

काश्मीरमध्ये यंदा गणरायाचा जयघोष! तीन गणेश मंडळांना गणेशमूर्ती प्रदान; बालन यांचा पुढाकार

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन कोळपे हे रात्री आपल्या ‘पी ॲन्ड के’ औषध दुकानात होते. या वेळी चार तरुण दुकानाच्या बाहेर ओट्यावर गोंधळ घालत होते. कोळपे यांनी त्यांना हटकून इथे गोंधळ घालू नका असं सांगितलं. यामुळे चिडून चौघे जण दुकानात आले व त्यांनी शिवीगाळ करीत कोळपे यांना धक्काबुक्की केली. तसंच मेडिकल फोडून टाकण्याची धमकी दिली. यानंतर ते दुचाकीवर निघून गेले. ते अनोळखी होते. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

 

Exit mobile version