Duleep Trophy 2024: हिरा सापडला ! पदार्पणातच सरफराजच्या भावाचे तडाखेबाज शतक; अनुभवी गोलंदाजांना झुंजविले

  • Written By: Published:
Duleep Trophy 2024: हिरा सापडला ! पदार्पणातच सरफराजच्या भावाचे तडाखेबाज शतक; अनुभवी गोलंदाजांना झुंजविले

Musheer Khan hundred in Duleep Trophy 2024 बंगळुरू: दुलिप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy 2024) सरफराज खानचा (
Musheer Khan) लहान भाऊ मुशीर खान याने पदार्पपणातच मोठा कारनामा केलाय. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात 19 वर्षीय मुशीर खानने 227 चेंडूत खेळत नाबाद 105 धावा केल्यात. टीम इंडियाकडून खेळणाऱ्या सरफराज खान (Sarfaraz Khan) हा नऊ धावांवर बाद झाला. पण त्याचा लहान भाऊ मुशीर खान याने संयमाने खेळत बिकट परिस्थिती असलेल्या संघाला संकटातून बाहेर काढले आहे.

यंदा या स्पर्धेमध्ये झोननुसार संघ न करता इंडिया नावाने ए, बी, सी आणि डी असे चार संघ आहेत. इंडिया बी संघात सरफराज आणि मुशीर या दोघा भावांचा समावेश झालेला आहे. इंडिया ‘बी’ संघाची इंडिया ‘ए’ संघाविरुद्ध लढत सुरू आहे. पहिल्याच दिवशी इंडिया बी संघाची सुरुवात एकदम खराब झाली. दोन फलंदाज 53 धावांवर तंबूत परतले होते.

कर्णधार अभिमन्यू ईश्वरन हा तंबूत परतल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजीला आलेल्या मुशीर खानने एका बाजूने डाव सांभाळला. परंतु त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. सरफरात खान हे नऊ धावांवर बाद झाला. तर रिषभ पंतही सात धावांवर तंबूत परतला. नितेशकुमार रेड्डी आणि वाशिंग्टन सुंदर हे भोपळाही फोडू शकले नाहीत. सात बाद 94 अशी अवस्था इंडिया बी संघाची झाली होती. एका बाजूने डाव सांभाळणाऱ्या मुशीरला नवदीप सैनीने चांगली साथ दिली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी 108 धावांची भागीदारी करत धावसंख्या 7 बाद 202 धावांपर्यंत नेली आहे. सैनी 29 धावांवर खेळत आहे.


जीवदान मिळाले आणि संधी साधली

मुशीर खान हा 69 धावांवर खेळत होतेा. त्यावेळी आवेश खानच्या गोलंदाजीवर त्याला जीवदानही मिळाले आहे. 19 वर्षांखालील वर्ल्डकप आणि रणजीमध्ये मुशीरने जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या गोलंदाजांसमोर अनुभवी फलंदाज नांग्या टाकत असताना मुशीर मात्र त्यांच्यासमोर सहज खेळतोय. खलिल अहमद, आकाशदीप, आवेश खान, शिवम दुबे, कुलदीप यादव या गोलंदाज मुशीरला बाद करू शकले नाहीत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube