Sarfraj Khan Debut : मुलाच्या डोक्यावर टीम इंडियाची कॅप अन् वडिलांना अश्रू अनावर; सरफराज इंग्लंडविरूद्ध मैदानात
Sarfraj Khan Debut : भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड विरुद्ध राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये सरफराज खान (Sarfraj Khan Debut ) या खेळाडूला संधी मिळाली. टेस्ट मॅचमध्ये सरफराजचं हे पदार्पण असणार आहे. त्यावेळी टॉसच्या अगोदरच सरफराजला टीम इंडियाची कॅप देण्यात आली. त्यानंतर तो ही कॅप घालून मैदानावर उतरला असता त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं.
‘मनापासून अधिवेशन घ्या, उगाच नौटंकी नको…’, तनपुरेंची सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सरफराजचं चांगलं रेकॉर्ड आहे. त्यानंतर आता तो इंटरनॅशनल सामना खेळत आहे. टीम इंडियाने राजकोट टेस्टसाठी सरफराज आणि ध्रुव जुरेल यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये घेतलं आहे. या दोघांचंही हे पदार्पण असणार आहे. या सामन्याचे काही फोटो बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत.
Shiv Rawail: ‘शाहरुखने शिव रवैलच्या ‘द रेल्वे मेन’ सिरीजचं केलं तोंडभरून कौतुक, म्हणाला…
यावेळी सरफराज टेस्ट कॅप घेऊन आपल्या वडिलांकडे पोहोचला. त्यावेळी त्याचे वडील भावूक झाले होते. तसेच त्यांना अश्रू देखील अनावर झाले होते. सरफराज खानने आतापर्यंत चांगलं रेकॉर्ड केलं आहे .तो फर्स्ट क्लासमध्ये तिहेरी शतक देखील लगावलं आहे. तसेच या फॉरमॅटच्या 45 सामन्यांमध्ये 3912 रन केले आहेत.
वाकचौरेंना शिर्डीचं तिकीट फिक्स, नाराज घोलपांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र!
ज्यामध्ये 14 शतक आणि अकरा अर्धशतक आहेत. तसेच त्याचा सर्वश्रेष्ठ नाबाद स्कोर हा 301 राहिला आहे. तर लिस्ट ए च्या 37 सामन्यांमध्ये त्याने 629 रन केले आहेत. सरफराज ने 96 t20 सामनेही खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 1188 केले आहेत. इंडिया ए साठी खेळताना सरफराजने इंग्लंड लायन्सच्या विरुद्ध शतक केलं होतं. आमदाबाद मध्ये 24 जानेवारीला झालेल्या सामन्यात त्याने 161 रन केले होते.