Download App

प्रसिध्द रंगभूषाकार विक्रम गायकवाड निधन; वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चेहऱ्यांचा किमयागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विक्रम गायकवाड यांना फार लहानपणी आपल्यात असलेल्या कौशल्याचा सूर

Makeup artist Vikram Gaikwad Passes Away : प्रसिध्द रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. (Gaikwad) त्यांच्या पार्थिवावर शनिवारी संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, झुबैदा, ओमकारा, मकबूल, लोकमान्य : एक युगपुरुष ते अगदी अलिकडच्या काळात आदिपुरुष, पन्नियन सेल्वन सारख्या चित्रपटांसाठी रंगभूषाकार म्हणून काम पाहिलेले, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड गेले काही महिने आजारी होते. करोना काळात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी वाढत गेल्या. पाच-सहा दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

बेबीराजेच्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे; स्वानंदी टिकेकरला लागला ‘सुंदर मी होणार’चा ध्यास

चेहऱ्यांचा किमयागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विक्रम गायकवाड यांना फार लहानपणी आपल्यात असलेल्या कौशल्याचा सूर गवसला होता. पुण्यात लहानाचे मोठे झालेल्या विक्रम यांनी सातवी-आठवीत असताना रंगभूषाकार बबनराव शिंदे यांच्याबरोबर नाटकात रंगभूषेचे काम करण्यास सुरूवात केली होती. केवळ रंगांच्या जोरावर एखाद्या व्यक्तीला एका वेगळ्याच रुपात बदलून टाकण्याच्या या किमयेने ते मोहून गेले.

बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पूर्णवेळ बबनराव शिंदे यांच्याबरोबर रंगभूषेचे काम करू लागले. पुढे एफटीआयआयमध्ये प्रसिध्द रंगभूषाकार आंजी बाबू यांना सहाय्यकाची गरज होती. विक्रम यांनी आंजी बाबूंबरोबर रंगभूषाकार म्हणून एफटीआयआयमध्ये काम करायला सुरूवात केली. चार वर्षांच्या त्या काळात राम कदम यांनी पठ्ठे बापूराव यांच्यावर केलेल्या ‘पवळा’ या चित्रपटासाठी रंगभूषा करण्याची संधी त्यांना मिळाली. एफटीआयआयची ही चार वर्ष प्रोस्थेटिक मेकअपसह रंगभूषेतील अनेक खाचाखोचा शिकवणारी ठरली, असे ते म्हणत असत.

 

follow us

संबंधित बातम्या