Download App

ब्रेकिंग : भारताविरूद्ध कोणतेही दहशतवादी कृत्य ‘अ‍ॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

  • Written By: Last Updated:

Any Terror Attack Will Be Considered Under Act Of War Says Indian Government : पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारताविरोधातील कोणतेही दहशतवादी कृत्य ‘अ‍ॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार आहे. आता दहशतवादाविरुद्ध (Terrorist) कोणत्याही प्रकारच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही. भविष्यात भारताविरोधात होणारी कोणतीही दहशतवादी कारवाई ही भारताविरुद्धचे युद्ध मानली जाईल आणि या प्रकारच्या कृतींना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल.

संध्याकाळी सहा वाजता महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स

पाकिस्तानकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या ना-पाक कारवायांना भारत कशाप्रकारे तोंड देत आहेत याबद्दल माहिती देत आहे. आज (दि.9) सकाळी साडेदहावाजतादेखील परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषध पार पडली होती. त्यानंतर आता पुन्हा संध्याकाळी सहा वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे.

ब्रेकिंग : भारताला मोठं यश! ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये मसूद अझहरच्या मेव्हण्यासह ‘टॉप पाच’ दहशतवादी ठार

पाकिस्तानचे 7 एअरबेग्स नेस्तनाबूत

सकाळी परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi ) यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने  प्रत्युरात केलेल्या कारवाईत सियालकोट येथील एअरबेसवर हल्ला करत त्याला उद्ध्वस्त केले आहे. पाकिस्तानकडून २६ हून अधिक ठिकाणी हल्ले करण्यात आल्याचेही यावेळी कुरेशी यांनी सांगितले.

पाकिस्तानकडून (India-Pakistan War) वारंवार भारताच्या नागरी वस्त्यांवर हल्ला करत असल्याचेही कुरेशी यांनी यावेळी सांगितले. तसेच आम्हाला सीमेवर तणाव वाढवायचा नसल्याचेही त्या म्हणाल्या. पण पण पाकिस्तानकडून चिथावणीखोर कारवाया केल्या जात आहेत. पाकिस्तानच्या रफिकी, मुरीद, चकलाला, रहिम यार, सुकूर या हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. या पाच ठिकाणी भारतीय वायूदलाच्या फायटर जेटनी हल्ला केला. यामध्ये कुसूर येथील रडार आणि सियालकोट येथील लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले.

India-Pak War : पाकिस्तानला कर्ज देणाऱ्या IMF कडे इतके पैसे कुठून येतात?

PMO मध्ये उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरूच 

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू असून, आज मोदींनी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस आणि तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते.

follow us