Pahalgam Terror Attack : कसं मोदी सरकार म्हणेल तसं… शरद पवारांनी दिलं समर्थन

Sharad Pawar : पहलगाम येथे झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर भारत सरकारकडून (Government of India) हालचालींना वेग आला आहे. काल सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक पावलावर सरकारसोबत आहे असं म्हटलं आहे. त्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) हीच भूमिका घेतली.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींना दिलासा, न्यायालयाकडून नोटीस बजावण्यास नकार
शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, काल काश्मिरमध्ये जे झालं, ते दुर्दैवी आहे. या हल्ल्यानंतर आता सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारसोबत राहिलं पाहिजे. यात राजकारण आणता कामा नये. अतिरेक्यांनी जी कारवाई केली, ती देशाविराधात केलेली कारवाई आहे. कालच्या सर्वपक्षीय बैठकीत आमच्या पक्षाच्या वतीने खासदार सप्रिया सुळे बैठकीला हजर होत्या. मला आनंद आहे, सर्व राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घतली. जे निर्णय सरकार घेईल, त्यात आम्ही सरकार सोबत आहोत, असं शऱद पवार म्हणाले.
राहुल गांधींना हवे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘हिंदुत्व पुस्तक’, न्यायालयात अर्ज
पुढं ते म्हणाले की, केंद्र सरकारला सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. आम्ही या प्रकरणात सरकारसोबत आहोत. पण, हा हल्ला सरकारने अधिक गांभीर्याने घेतला पाहिजे. गेले काही दिवस सरकारकडून सांगितलं गेलंय की, दहशतवाद आम्ही संपलला. आता काही चिंता नाही. दहशतवाद कमी होत असेल तर चांगलचं आहे. मात्र, कालच्या हल्ला झाला आणि सरकार कमी पडतय, संरक्षण धोरणात कुठं ना कुठं कमतरता आहे, हे समोर आलं. देशावर हल्ला होत असेल आणि सरकार गांभीर्याने घेत असेल तर ही कमतरता दूर करण्यासाठी तातडीने पावलं उचलली पाहिजेत, असं पवार म्हणाले.
ज्यांनी हल्ले केले, त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याची गरज आहे, असंही पवार म्हणाले.
राजकारण आणू नका
दहशदवाद्यांनी धर्म पाहून लोकांना गोळ्या घातल्याची चर्चा आहे. यावर बोलतांना पवार म्हणाले, याबाबत मला पुरेशी माहिती नाही. मात्र, अतिरेक्यांनी यापूर्वीही हल्ले करण्याची अॅक्शन घेतली. तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आज धर्माची चर्चा का होतेय. माझं म्हणणं असं आहे की, धार्मिक अंतर वाढेल, असं काम करू नका, यात राजकारण आणू नका, असं ते म्हणाले.