Video : शरद पवारांनी फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

Gopichand Padalkar On Sharad Pawar: सध्या राज्यात औरंगजेब आणि वाघ्या कुत्र्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी इतिहासावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर आज पुण्यात (Pune) पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच त्याठिकाणी आणखी 20 पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले पाहिजे असं गोपीचंद पडळकर म्हणाले. तसेच त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या (Waghya Dog) समाधीबाबत राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे अशी देखील प्रतिक्रिया दिली.
तर दुसरीकडे यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, उदयनराजे यांच्याबद्दल नितांत आदर आहे, हे खुसपट ब्रिगेडने काढले आहेत. शरद पवारांना फॉर असलेल्या या संघटना विषय बाहेर काढतात. सगळे इतिहासकार पवार साहेबांना फॉर आहेत. शरद पवारांनी फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा. एकदाच नवीन इतिहास लिहा, म्हणजे पुढच्या पिढ्यांना इतिहास लिहण्याची गरज नाही, अशी टीका शरद पवारांवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना केली.
तर यावेळी त्यांनी राज्यात फुले चित्रपटावरुन सुरु असणाऱ्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आज जात बघून इतिहास काढायचा. नवीन इतिहासकार जागे झाले आहेत, नवीन इतिहासकार लॉंच झाले आहे हे इतिहासकार 250 रुपयांचे जॅकेट घालून फिरत असतात असं देखील माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले.
निळवंडे लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना उन्हाळी हंगामातील आवर्तन सुरू
तसेच त्यांनी यावेळी एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबतही भाष्य केले. एमपीएसमध्ये आता अनेक पुढारी तयार झाले आहेत. विद्यार्थ्यांनी जर मला त्यांचा विषय दिला तर मी मुख्यमंत्री यांच्याशी बोलेन. राज्य सरकारने स्पर्धा परीक्षा क्लासेसबद्दल मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे असं देखील पडळकर म्हणाले.