लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? जाणून घ्या एका क्लीकवर सर्वकाही…

लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? जाणून घ्या एका क्लीकवर सर्वकाही…

Colonel Sophia Qureshi Salary : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविला होता. या ऑपरेशनबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यासाठी भारताने कर्नल सोफिया कुरेशी यांची निवड केली होती. त्यानंतर देशातील सोशल मीडियावर कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sophia Qureshi) यांच्या नावाची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सोफिया कुरेशी कोण आहे? याबाबत लोकांना जाणून घ्यायचे आहे.

सोफिया कुरेशी गुजरातमधील वडोदरा येथील असून त्यांचा जन्म 1981 मध्ये झाला आहे. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांचे लहानपणापासूनच सैन्याशी नाते आहे. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही सैन्यात होते. पती देखील कॅनिज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत.सोफिया यांनी 1999 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) मध्ये प्रशिक्षण घेतले आणि लेफ्टनंट म्हणून सैन्यात कमिशन घेतली. त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी ईशान्येकडील पूर मदत कार्यात आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेसारख्या प्रमुख मोहिमांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली.  सोफिया कुरेशी या बेळगावच्या सूनबाई आहेत. त्यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हेदेखील भारतील लष्करामध्ये कर्नल पदावर कार्यरत आहेत.

सोफिया कुरेशींना पगार किती?

सोफिया कुरेशी यांच्या पगाराची नेमकी माहिती सार्वजनिक नसली तरी, भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलचा मासिक पगार साधारणपणे 1 लाख ते 2 लाखांच्या दरम्यान असतो. यामध्ये समाविष्ट आहे- मूळ वेतन, लष्करी सेवा वेतन (MSP), महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) चा समावेश असतो. ऑपरेशन सिंदूर सारख्या मोठ्या आणि धोकादायक मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना विशेष ऑपरेशन्स भत्ता देखील मिळू शकतो. जर अधिकारी उच्च जोखीम क्षेत्रात तैनात असेल तर त्याचा पगार आणखी वाढतो. या सर्व सुविधा आणि भत्ते सरकार आणि सैन्याने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिले जातात.

Operation Sindoor नंतर पाकिस्तान घाबरला, PSL चे सर्व सामने रद्द होणार?

तर दुसरीकडे 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली होती. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर कठोर कारवाई करत सिंधू जल करार रद्द केला होता. तसेच पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. तर आता पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube