Video : पुण्याची वाहतूक व्यवस्था कुणामुळं बिघडली?, मुरलीधर मोहळांनी सांगितला नवा प्लॅन

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुण्यात झालेल्या कामांचा पाढाच यावेळी वाचला

News Photo   2026 01 14T171835.792

पुण्याची वाहतूक व्यवस्था कुणामुळं बिघडली?, मुरलीधर मोहळांनी सांगितला नवा प्लॅन

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री (Pune) आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार जोमाने उतरल्याने निवडणूक अवघड गेली का? यावरवर बोलताना पुण्याचे खासदार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ म्हणाले, असं अजितबात नाही. आम्ही यावेळी गेल्यावेळी ज्या जागा होत्या त्यामध्ये 10 ते 15 जागा नक्कीच जास्त जागा मिळवू असा विश्वास व्यक्त केला आहे. कारण आमचे तसेच सर्वे आहेत आणि पुण्याचे लोकही फार लक्षपूर्वक मतदान करतात असंही ते यावेळी म्हणाले. ते लेट्सअप मराठीवर लेट्सअप सभा या विशेष मुलाखतीत बोलत होते.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुण्यात झालेल्या कामांचा पाढाच यावेळी वाचला. मेट्रो आली, कचऱ्यासाठी व्यवस्थापन झालं. चांदणी चौकाचा प्रल्प झाला. ईबस आल्या. आमृत योजनेतून पैसे आले. नदी प्रकल्प झाले. महापालिका म्हणून समान पाणी पुरवठा योजना. जवळपास 700 बेडची दोन रुग्णालय उभा राहिली. कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभा राहिले. त्यामुळे ही सगळी काम पुण्याच्या लोकांच्या जगण्याशी संबंधीत आहे. त्यामुळे पुण्याचे लोक हे विकासावर मतदान करतात, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं पाहून मतदान करणार आहेत.

तुम्ही काहीही आरोप कराल आणि आम्ही सहन करणार, असं होणार नाही; महेश लांडगेंचा अजित पवारांना स्पष्ट इशारा

गिरीश बापट आणि सुरेश कलमाडी यांच्यानंतर आता मुरलीधर मोहळ यांच्याकडंच पुण्याचं नेतृत्व असेल असं म्हटलं जातय. त्यावर बोलतना आजही मी या लोकांच्या पंगतीत नसून मला कार्यकर्ता म्हणूनच राहायला आवडेल असं मोहळ म्हणाले. तसंच, तुमचे पहिल्या प्राथमिक पातळीवर मनात कोणते प्रश्न आहेत असं विचारलं त्यावर मोहळ म्हणाले सर्वात महत्वाचा प्रश्न आहे वाहतूक प्रश्न. त्यावर काम करण आता गरज आहे. वाहतूक ही समस्या आहे हे मान्यच केलं पाहिजे असंही मोहळ यावेळी म्हणाले. हे सांगताना आता मेट्रोच जाळ पुण्यात उभ राहत आहे असंही ते म्हणाले.

पीएमपीएल बस वाढवण हे आमचं धोरण आहे. आता चार हजार बस यामध्ये वाढवायच्या आहेत. त्याचबरोबर शहरातील रिंगरोडचाही पर्याय लवकर सोडवायचा आहे. त्याबद्दलही प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर अंडरग्राऊंडही रोडच काम सुरू आहे. ही वाहतूक समस्या आहे ती आत्ताची नसून मागची आहे. मागील 40 वर्षापासून राज्य करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या दुरदृष्टीचा अभाव आहे असं म्हणत मोहळ यांनी नाव न घेता अजित पवार यांना टोला लगावला आहे. मागच्या लोकांनी यावर वेळीच लक्ष दिलं असतं तर या समस्या उद्भल्या नसत्या असंही ते यावेळी म्हणाले.

Exit mobile version