Download App

Maharashtra CM : भाजपने उद्धव ठाकरेंसारखेच शिंदेंना फसवले, पृथ्वीराज चव्हाण यांचा आ ज चव्हाण यांचे मोठे विधान

पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं. भाजपने उद्धव ठाकरे यांच्यासारखीच एकनाथ शिंदेंची फसवणूक केल्याचा दावा चव्हाण यांनी केला.

  • Written By: Last Updated:

Prithviraj Chavan :  विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) प्रचंड बहुमत मिळाले, मात्र निकाल लागून दहा दिवस झाले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदी (Chief Minister) कोण विराजमान होणार हे ठरत नाही. तर दुसरीकडे काळजीवाहू एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा आहे. भाजपचाच (BJP) मुख्यमंत्री होणार अशी चर्चा आहे. यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठं विधान केलं. भाजपने उद्धव ठाकरे यांच्यासारखीच एकनाथ शिंदेंची फसवणूक केल्याचा दावा चव्हाण यांनी केला.

EVM विरोधात काँग्रेसनंतर वंचित बहुजन आघाडीही मैदानात, उभारणार जनआंदोलन 

पैसा आणि सत्तेच्या जोरावर भाजप लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महायुतीने यंदाची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. त्यामुळे शिंदे यांची फसवणूक होणार नाही, अशी अपेक्षा होती. पण भाजपने त्यांची उद्धव ठाकरेंसारखीच फसवणूक केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उद्धव यांची फसवणूक केली होती. त्याच पद्धतीने आता शिंदे यांची फसवणूक झाली. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून लोकशाही केली. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले. मात्र निवडणूक आयोगाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याने फक्त बघ्याची भूमिका घेतली.

EVM विरोधात काँग्रेसनंतर वंचित बहुजन आघाडीही मैदानात, उभारणार जनआंदोलन 

यावेळी चव्हाण यांनी ईव्हीएमवर शंका घेतली. ते म्हणाले, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. सध्या निवडणूक पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पडल्याचा दावा केला जात आहे. पण तरीही लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत साशंकता आहे. ईव्हीएम सुरक्षित आहेत, असे आयोगाला वाटत असेल तर सरकार सर्व मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीला किंवा आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक तज्ञांची समिती स्थापन करण्यास का घाबरते? असा सवाल चव्हाण यांनी केला.

ते म्हणाले, कोणत्याही निवडणुकीत जनतेचा विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. पण जनतेला ईव्हीएमवर थोडाही विश्वास राहिला नाही. त्यामुळे जनतेतून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी होत आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्रातील भाजपा सरकारवर तीव्र नाराजी दर्शवली. पण त्यानंतर अवघ्या 4 महिन्यांत अचानक मतदारांच्या मनात एवढा बदल होतो की, भाजप महायुती जनतेचा विश्वास संपादन करते ही अशक्य व अविश्वसनीय गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवरही टीका केली. कोणत्याही निवडणुकीत जनतेचा विश्वास असणे अत्यंत गरजेचे असते. पण लोकांना ईव्हीएमवर जराही विश्वास राहिला नाही. त्यामुळे जनता पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्रातील भाजप सरकारवर जनतेने तीव्र नाराजी दर्शवली. पण त्यानंतर अवघ्या 4 महिन्यांत अचानक मतदारांच्या मनात एवढा बदल होऊन भापज महायुती सरकारविषयी इतका विश्वास संपादन होणं हे अशक्य आणि अविश्वसनीय आहे, असं ते म्हणाले.

follow us