भांडी घासा अन् बाथरूम स्वच्छ करा, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांना शिक्षा

  • Written By: Published:
भांडी घासा अन् बाथरूम स्वच्छ करा, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांना शिक्षा

Sukhbir Badal Punishment: डेरा प्रमुख राम रहीमला माफी मिळवून देण्याच्या प्रकरणात अकाल तख्तने (शीख धर्मातील सर्वोच्च समिती) पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली नेते सुखबीर बादल (Sukhbir Badal) यांना शिक्षा सुनावली आहे. अकाल तख्तने सुवर्ण मंदिरातील बाथरूम स्वच्छ करण्याचे आणि भांडी धुण्याची शिक्षा सुखबीर बादल यांना दिली आहे. याच बरोबर अकाल तख्तने निर्णय घेतला आहे की, माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्याकडून फकर-ए-कौम पुरस्कारही परत घेतला जाणार आहे. त्यामुळे बादल कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

प्रकरण काय?

अकाली सरकारमध्ये असताना सुखबीर बादल यांनी वादग्रस्त धर्मगुरू डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला माफी देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी डेरा मुखीला माफी मिळवून दिली. तर आता त्यांनी आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी अकाल तख्त साहिबच्या पाच सिंह साहिबांसमोर चूक मान्य केली आहे. आमच्याकडून अनेक चुका झाल्या आहेत. अपमानाच्या घटना आमच्या सरकारच्या काळात घडल्या. आम्ही दोषींना शिक्षा करण्यात अपयशी ठरलो. असं अकाल तख्त साहिबच्या पाच सिंह साहिबांसमोर सुखबीर बादल यांनी म्हटले आहे.

सरकारमधील जातीय मुद्द्यांवरुन लक्ष वळवणे, शीख तरुणांवर अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती देणे, राम रहीमवर दाखल झालेला गुन्हा मागे घेणे, जथेदारांना चंदीगड येथील निवासस्थानी बोलावून राम रहीमला माफ करण्यास सांगणे, पवित्र प्रतिमांची चोरी आणि विटंबनाच्या प्रकरणांचा तपास न करणे, संगतांवर लाठीचार्ज आणि गोळीबार करणे असे आरोप पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर करण्यात आले आहे.

EVM मध्ये फेरफार म्हणून भाजपला 10 टक्यांचा लाभ, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी अद्याप या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र राजकीय दृष्टिकोनातून ही शिक्षा महत्त्वाची मानली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने या प्रकरणावरून अकालींवर निशाणा निशाणा साधला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या