बीड तालुक्यातील खापर पांगरी येथील युवा शेतकरी षीमंत्र्याच्या भेटीला आले होते.कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटी दरम्यान त्यांना दाखवण्यासाठी त्यांनी काळा ऊस आणला होता.मात्र शेतकरी इंजिनिअर कडून ऊसाची माहिती घेण्याआधीच तो धनंजय मुंडेंनी खाऊन पाहिला.हा ऊस खाण्यासाठी आयुर्वेदिक दृष्टीने गुणकारी आणि खाण्यास अत्यंत सोपा असल्याची माहिती दिली गेली.यावेळी ऊस उत्पादनातील नवनवीन प्रयोगांची माहिती घेऊन धनंजय मुंडेंनीही त्याचे कौतुक केले आहे.बीड तालुक्यातील खापर पांगरी येथील इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतलेला ईश्वर शिंदे हा तरुण चर्चेत आलाय.एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीच एका शेतकऱ्याच्या श्रमाचे मोल जाणू शकतो, अशी प्रतिक्रिया ईश्वरने दिली.