Chandrayan – 3 उतरलेल्या भागाला ‘शिवशक्ती’ पॉईंट हे नाव का देण्यात आले?

भारताच्या चांद्रयान तीन च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करत इस्रोला भेट दिली. मोदींच्या या इस्रो दौऱ्यात अनेक घोषणा केल्या. या घोषणेत मोदींनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 उतरलेल्या भागाला शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखले जाईल असे जाहीर केले. तर चांद्रयान 2 चंद्राच्या ज्या भागापर्यंत पोहोचल होतं त्या भागाला तिरंगा म्हणून ओळखलं […]

Shivshakti

Shivshakti

YouTube video player

भारताच्या चांद्रयान तीन च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करत इस्रोला भेट दिली. मोदींच्या या इस्रो दौऱ्यात अनेक घोषणा केल्या.

या घोषणेत मोदींनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 उतरलेल्या भागाला शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखले जाईल असे जाहीर केले. तर चांद्रयान 2 चंद्राच्या ज्या भागापर्यंत पोहोचल होतं त्या भागाला तिरंगा म्हणून ओळखलं जाईल आणि 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा होणार असल्याचेही जाहीर केलं.

मात्र अनेकांना शिवशक्ती पॉइंट हेच नाव का देण्यात आलं? असा प्रश्न पडलाय. या शब्दाचा चंद्राशी काय संबंध? हे आपण जाणून घेऊया…

‘शिवशक्ती पॉईंट’ असे नाव का?
– पवित्र श्रावण महिन्यात चांद्रयान – 3 मोहीम यशस्वी झाली म्हणून ‘शिवशक्ती’ हे नाव दिले
– भगवान शिव आणि त्यांच्या डोक्यावरील चंद्र हे सुध्दा ‘शिवशक्ती’ नाव देण्याचे एक कारण

Exit mobile version