Download App

देशातील पहिली AI शाळा आहे तरी कशी?

आजच्या सुपरफास्ट टेक्नॉलॉजीच्या युगातील मोठा अविष्कार म्हणजे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स). या वेगळ्या धाटणीचचे अन् तितक्याच सुपरडुपर टेक्नॉलॉजीचे अनेक चमत्कार आपण ऐकले आणि पाहिलेही असतील.

भूतकाळातील एखाद्या व्यक्तीचे चित्र रेखाटणे असो, आजारी रुग्णाला औषधे सांगणे असो, एखाद्या विषयावर निबंध लिहीणे असो की नॉलेजच्या महासागरात काही शोधणं असो, या सगळ्या गोष्टी AI च्या मदतीने अगदी सोप्या वाटू लागल्या आहेत.

या तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाची लाईफ, रोजची कामं, कार्यालयातील कामे सोपी झाली असली तरी हा ऑनलाइन मित्र अनेकांना शत्रूही वाटू लागला आहे. हे काहीही असू द्या पण, आज AI तंत्रज्ञान विविध क्षेत्रात वापरले जाऊ लागले आहे.

आता तर AI ची एक मोठी बातमी भारतातूनच आली ती दक्षिण भारतातील केरळ राज्यात पहिली AI शाळा सुरू करण्यात आली आहे. होय…तिरुअनंतपूरम येथे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. ही शाळा आयलर्निंग इंजिन (आयएलई) USA आणि वैदिक ईस्कूल यांच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे. AI टूलच्या मदतीने शाळेतील अभ्यासक्रम, पर्सनलाइज्ड लर्निंग, मूल्यांकन आणि शिक्षणाच्या अन्य घटकांत या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

Tags

follow us