Navratri 2023 : नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या साडेतीन शक्तीपीठांच्या अख्यायिका काय? त्यांची महती काय? जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीने सुरू केलीय खास शक्तीपीठांची माहिती देणारी व्हिडीओ सिरीज. त्यामुळे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…
देवीचं आद्य म्हणजे पहिलं शक्तीपीठ कोणत आहे? त्याचं महत्व आणि अख्यायिका काय? कोल्हापूरची आदीमाय महालक्ष्मी म्हणजे देवीच्या साडेतीन शक्ती पीठांतील पहिलं शक्तीपीठ या मंदीराच्या बांधकामावरून ते इ.स. 600 ते 700 मध्ये म्हणजे चालुक्यांच्या काळातील असण्याची शक्यता आहे. तर मंदीराचे पहिलं बांधकाम हे राष्ट्रकूट किंवा त्या अगोदर शिलाहार राजांनी सुमारे 8 व्या शतकात बांधले असल्याचेही बोलले जाते. कारण पुराणं, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्र आणि काही कागदपत्र यावरून अंबाबाईच्या या मंदीराच्या पुरातन असण्याचे पुरावे मिळतात.