भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी पुढील चार महिने अत्यंत खास असणार आहेत. कारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अशिया कप तर ऑक्टोबरमध्ये लगेचच वर्ल्डकप आणि तोही भारतात खेळवला जाणार असल्याने क्रिडारसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र यादरम्यान आता एक मुद्दा चर्चेला आला आहे. तो म्हणजे टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर वारंवार उपस्थित होणारे प्रश्न आणि चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाचं न सुटणारं कोड. ज्या क्रमांकावर भारताचा कोच राहुल द्रविड इतका यशस्वी झाला आज त्याच क्रमांकासाठी इतका संघर्ष का? क्रिकेटमधील या चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूला एवढं महत्त्व का? तसेच या क्रमांकावर कोणते खेळाडू दावा टाकू शकतात..
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतेच वक्तव्य केले होते की, भारतीय संघाला युवराज सिंगनंतर नंबर-4 वर एकही चांगला खेळाडू मिळालेला नाही. टीम इंडियाने 2019 पासून या क्रमांकावर अनेक खेळाडूंना आजमावले आहे, फारसे यश मिळवता आले नाही. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. की, त्यावरून चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूवर वादविवाद सुरू झाले आहेत. यावर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगूली म्हणाले की, भारताकडे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी अनेक खेळाडू आहेत. तसेच एकाच क्रमांकाला एवढ महत्त्व देऊन वर्ल्डकप जिंकता येत नाही.
कारण मी देखील सुरूवातीला मधल्या फळीत खेळलो आणि नंतर ओपनिंग देखील केली. तसंच सचिनचही झालं तो सुरूवातीला सहाव्या क्रमांकावर खेळला पण नंतर त्याने ओपनिंग केली आणि तो जागतिक खेळाडू झाला. असं म्हणत गांगूली यांनी चौथ्या क्रमांकावर होणाऱ्या अतिचर्चांवर पडदा टाकला.
अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…