Download App

भारतीय ध्वज संहिता काय सांगते? पाहा व्हिडिओ

भारतीय संहिते अंतर्गत लागू करण्यात आलेले ध्वजारोहणाचे नियम काय आहेत तेही पहा –
– ज्या ठिकाणी ध्वज फडकवला जाईल ती जागा योग्य असावी तर तिरंगा हा सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी फडकवावा.
– कोणताही ध्वज तिरंग्याच्या शेजारी लावायचा असेल तर त्याची उंची तिरंग्यापेक्षा खाली किंवा कमी असावी
– तिरंगा फडकवण्याच्या वेळेस बिगुल चा वापर करावा
– फडकवण्यात येणारा तिरंगा कोणत्याही कारणामुळे कापला किंवा फाटला असेल तो नियमानुसार नष्ट करावा
– आपल्या राष्ट्रध्वजाचा कसल्याही प्रकारे जमिनीला स्पर्श होऊ देता कामा नये
– एखाद्या मंचावर ध्वजारोहण होत असेल तर वक्त्याने समोर पाहावे आणि आपला राष्ट्रध्वज हा उजवीकडे असावा.
– राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असणं गरजेचे आणि त्याची लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3:2 असा असाव.
– तर नियमानुसार ध्वजारोहण करताना तिरंग्याचा भगवा रंग हा शीर्षस्थानी असावा मध्यभागी पांढरा आणि तळाशी हिरवा असावा आणि अशोक चक्र मध्यभागी असावे ज्यात 24 आरे असाव्यात
– याशिवाय तिरंग्याचा किंवा तिरंग्याचे चित्र असलेले कपडे पेहराव म्हणून वापरू नयेत.
– तिरंगा हा फक्त देशसेवेत शहीद झालेल्या सैनिकांच्या अंत्ययात्रेवेळीस त्यांना लपेटला जातो.
त्यानंतर तो तिरंगा रीतसर पद्धतीने काढूनही घेतला जातो.

Tags

follow us