Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला असून आज संध्याकाळी किंवा उद्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वीच उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आज तब्बल 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं असल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपासून काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) विदर्भातील काही जागांवर वाद निर्माण झाल्याने महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता मात्र आता काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावर एकमत झालं असून आज किंवा उद्या महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर दुसरीकडे आज उद्धव ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने अमित ठाकरें यांच्या विरोधात महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. याचबरोबर पक्षाने नाशिकमध्ये देखील आपला उमेदवार दिला आहे. पक्षाकडून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तसेच पक्षाकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात माजी आमदार वसंत गीते यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.
तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अद्वय हिरे यांना पक्षाने एबी फॉर्म दिले आहे. तर प्रविणा मोरजकर यांना कुर्ला विधानसभा मतदारसंघातून एबी फॉर्म देण्यात आले आहे. याचबरोबर वैभव नाईक यांना कुडाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
‘पौर्णिमेचा फेरा’ हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ युट्युब चॅनेलवर पाहता येणार
शिवसेना ठाकरे गटाकडून आज कोणी कोणी एबी फॉर्म घेतले
सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम), वसंत गिते(नाशिक मध्य), अद्वय हिरे (मालेगाव बाह्य), एकनाथ पवार (लोहा कंधार), के पी पाटील (राधानगरी विधानसभा), बाळ माने (रत्नागिरी विधानसभा), उदेश पाटेकर (मागाठाणे विधानसभा), अमर पाटील (सोलापूर दक्षिण), गणेश धात्रक (नांदगाव), दीपक आबा साळुंखे पाटील (सांगोला), प्रविणा मोरजकर (कुर्ला), एम के मढवी (ऐरोली), भास्कर जाधव (गुहागर), वैभव नाईक (कुडाळ), राजन साळवी (राजापूर लांजा), आदित्य ठाकरे (वरळी), संजय पोतनीस (कलिना) , सुनील प्रभू (दिंडोशी), राजन विचारे (ठाणे शहर), दीपेश म्हात्रे (डोंबिवली), कैलास पाटील (धाराशिव), मनोहर भोईर (उरण), महेश सावंत (माहीम), श्रद्धा जाधव (वडाळा), पाचोरा (वैशाली सूर्यवंशी), नितीन देशमुख (बाळापूर), किशनचंद तनवाणी (औरंगाबाद मध्य), राजू शिंदे ( औरंगाबाद पश्चिम), दिनेश परदेशी ( वैजापूर मतदारसंघ), उदयसिंह राजपूत ( कन्नड मतदारसंघ), सुरेश बनकर ( सिल्लोड मतदारसंघ), राहुल पाटील (परभणी), शंकरराव गडाख (नेवासा), सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण), सुनील राऊत (विक्रोळी), रमेश कोरगावकर (भांडुप पश्चिम), उन्मेश पाटील (चाळीसगाव), स्नेहल जगताप (महाड), ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व), केदार दिघे (कोपरी पाचपाखाडी)