Download App

Ahmednagar Assembly Election: आघाडीतील बंड शमले ! शशिकांत गाडे यांचा अभिषेक कळमकरांना पाठिंबा

माघारीचा अर्ज चुकून कार्यकर्त्याच्या हातात राहिला. दुसरा अर्ज लिहीपर्यंत माघारी घेण्याची वेळ संपली. मात्र आता अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देतो.

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Assembly Election: विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगर शहरात (Ahmednagar Assembly Election) मोठी घडामोड घडली होती. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र आघाडीतील घटकपक्षातील काही इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेकांनी अर्ज मागे घेत अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांना पाठिंबा जाहीर केलाय. पण ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे (Shashikant Gade) यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज तसाच ठेवला होता. त्यामुळे यामुळे कोठेतरी आघाडीमध्ये बंडाची ठिणगी पेटली होती. मात्र आज खासदार निलेश लंके यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये गाडे यांनी कळमकर यांना पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे नगर शहरातील बंडखोरी शमली आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.


अभिनेता भाऊ कदमही निवडणुकीच्या रिंगणात, अजित पवारांसाठी करणार प्रचार

माघारीचा अर्ज चुकून कार्यकर्त्याच्या हातात राहिला, दुसरा लिहीपर्यंत-
यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर , माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम , विक्रम राठोड , कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे उपस्थित होते. यावेळी प्रा. गाडे म्हणाले की , माघारीचा अर्ज चुकून कार्यकर्त्याच्या हातात राहिला. दुसरा अर्ज लिहीपर्यंत माघारी घेण्याची वेळ संपली. मात्र आता अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देत आहे. मी स्वतः उमेदवार समजून सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत. खासदार निलेश लंके यांनी महाआघाडीची एकजूट ठेऊन नगर शहर दहशत मुक्त करण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याची विनंती केली. यावेळी बाळासाहेब बोराटे , योगिराज गाडे उपस्थित होते.

दरम्यान आज दुपारी चार वाजेच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. आले होते व यामध्ये गाडे हे कळमकर यांना पाठिंबा देणार असे बोलले जात होते. मात्र पत्रकार परिषेद सुरू होण्यापूर्वीच गाडे संबंधित ठिकाणाहून निघून गेले होते. तसेच खासदार निलेश लंके देखील उशिरा आल्याने तर्क वितर्क लावले जाऊ लागले मात्र काही वेळांनी पुन्हा एकदा आघाडीतील सर्व प्रमुख पदधिकारी आले व त्यांनी पत्रकार परिषद घेत गाडे यांनी कळमकर यांना पाठिंबा जाहीर केला.

VIDEO : निवडणूक काळात पोलिसांच्याही गाड्यांची चेकिंग होणार; निवडणूक आयोगाचा निर्णय


बॅलेटपेपर नाव राहणारच

शशिकांत गाडे यांनी अभिषेक कळमकर यांना पाठिंबा दिला आहे. परंतु वेळेत अर्ज माघार न घेतल्याने त्यांचे नाव आता बॅलेटपेपरवर असणार आहे. त्यामुळे काही मतदान हे गाडे यांनीही होऊ शकते.

follow us