मोठी बातमी! नगरमध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर देणार संग्राम जगतापांना फाईट, उमेदवारी जाहीर

  • Written By: Published:
मोठी बातमी! नगरमध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर देणार संग्राम जगतापांना फाईट, उमेदवारी जाहीर

Abhishek Kalamkar :  अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता अहमदनगर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे संग्राम जगताप (Sangram Jagtap) आणि शरद पवार गटाचे (NCPSP) अभिषेक कळमकर यांच्यात सामना होणार आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 22 उमेदवारांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून नगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याची चर्चा जोराने सुरु होती मात्र आज जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अभिषेक कळमकर यांच्या नावाची घोषणा करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये पारनेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटल्याने नगरची जागा शिवसेनेला जाणार असल्याची देखील चर्चा जोराने सुरु होती मात्र नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षालाच मिळाली आहे. त्यामुळे यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना फाईट देणार आहे. तर अकोले मधून अमित भांगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दुसऱ्या यादीत एरंडोल विधानसभा मतदारसंघातून सतीश पाटील यांना, गंगापूरमधून सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर शहापूरमधून पांडुरंग बरोरा, परांडामधून राहुल मोटे, बीडमधून पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर, आर्वीमधून मयुरा काळे, बागलानमधून दीपिका चव्हाण, येवलामधून माणिकराव शिंदे, सिन्नरमधून उदय सांगळे, दिंडोरीमधून सुनीता चारोस्कर, नाशिक पूर्वमधून  गणेश गीते, उल्हासनगरमधून ओमी कलानी, जुन्नरमधून सत्यशील शेरकर, पिंपरीमधून सुलक्षणा शीलवंत, खडकवासलामधून सचिन दोडके, पर्वतीमधून अश्विनीताई कदम, अकोलेमधून अमित भांगरे, अहमदनगर शहरमधून अभिषेक कळमकर, माळशिरसमधून उत्तमराव जानकर, फलटणमधून दीपक चव्हाण, चंदगडमधून नंदिनीताई भाबुळकर कुपेकर आणि इचलकरंजीमधून मदन कारंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पाहाल तर याद राखा; यशोमती ठाकूरांचा फडणवीसांना इशारा

यापूर्वी देखील पक्षाने 45 उमेदवारांची घोषणा केली होती. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी 67 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube