आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पाहाल तर याद राखा; यशोमती ठाकूरांचा फडणवीसांना इशारा

  • Written By: Published:
आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पाहाल तर याद राखा; यशोमती ठाकूरांचा फडणवीसांना इशारा

Yashomati Thakur : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीचे (Mahayuti) नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. यातच नगरचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या संगमनेर तालुक्यात आयोजित एका जाहीर सभेत बोलताना भाजप (BJP) नेते वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी काँग्रेस (Congress) नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते महायुतीवर जोरदार टीका करत आहे.

या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पहाल तर याद राखा असा इशारा तिसवा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दिला आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात  भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्य विधान केल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहे. यशोमती ठाकूर यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पहाल तर याद राखा असा इशारा यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

सुजय विखे यांच्यासमोर भाजपच्या स्टेजवर भाजपच्या एका व्यक्तीने बाळासाहेब थोरात यांच्या कन्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले हे विखे आणि फडणवीस यांना पटत आहे का? ज्यांनी महिलांना प्रोटेक्शन करून आमदारकी घेतली आहे ते आता झोपले आहेत का यामधून महिलांप्रती आरएसएस आणि भाजपची काय मानसिकता आहे हे दिसून येत आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी हे वक्तव्य केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असेही यशोमती ठाकूर म्हणाला आहे.

‘हा सोपा निर्णय नव्हता’, द साबरमती रिपोर्ट बद्दल राशी खन्नानने केला मोठा खुलासा

असे वक्तव्य जर भाजपच्या नेत्यांना आवडत असेल तर त्यांचा निषेध आहे. देवेंद्रजी तुमच्या राज्यात काय चालले आहे याला आपण रामराज्य म्हणायचं का तुमचं असली रंग समोर येत असून आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पाहिला तर खबरदार याद राखा असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube